सासकलमध्ये ‘एल निनो’ जनजागृती शेतकरी शिवार फेरी उत्साहात

फलटण (आपलं फलटण)
कृषी विभागाच्या वतीने सासकल (ता. फलटण, जि. सातारा) येथे ‘एल निनो’ विषयावर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी शेतकरी शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. बदलत्या हवामान परिस्थितीत शेतीचे नियोजन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या फेरीत ज्येष्ठ शेतकरी वामन मुळीक, मनोहर मुळीक, ज्ञानदेव मुळीक, सिताराम मुळीक यांच्यासह प्रगतिशील शेतकरी व महिला सहभागी झाल्या.
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी खलिद मोमीन, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी शहाजी शिंदे व उप कृषी अधिकारी अजित सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी ‘एल निनो’मुळे मान्सून पावसात घट किंवा अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे विशेषतः खरीप हंगामावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून पिकांचे संरक्षण करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपाययोजनांवर भर
शिवार फेरीदरम्यान शेतकऱ्यांना विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली. कमी पाण्यावर येणारी बाजरी, ज्वारी, मका, सूर्यफूल, सोयाबीन, तूर व मूग यांसारखी पिके घेण्याचा सल्ला देण्यात आला. तसेच मान्सूनच्या अंदाजानुसार पेरणीची वेळ बदलणे व आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्यावर भर देण्यात आला.
जल व्यवस्थापनासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर, मल्चिंगद्वारे जमिनीतील ओलावा टिकवणे आणि शेततळ्यांद्वारे पाणी साठवणूक करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यासोबतच सेंद्रिय खतांचा वापर वाढवून जमिनीची सुपीकता टिकवणे व कीड-रोग नियंत्रणासाठी नियमित निरीक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला.
हवामान अंदाज व पीक विम्याचे महत्त्व
‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना’ अंतर्गत पिकांचा विमा काढण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच भारतीय हवामान विभागाच्या अंदाजांचा नियमित अभ्यास करून शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करावीत, असे मार्गदर्शन करण्यात आले.
या शिवार फेरीत सासकलसह पंचक्रोशीतील शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये हवामान बदलाबाबत जागरूकता वाढण्यास मदत होत आहे.

Spread the love
  • Related Posts

    फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त विठ्ठलवाडीत दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रात्यक्षिकमहिलांना व विद्यार्थ्यांना बासुंदी निर्मितीतून उद्योजकतेचे धडे

    फलटण( आपलं फलटण ) श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२६-२७ अंतर्गत तसेच फलटण…

    Spread the love

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
    error: Content is protected !!