फलटण पंचायत समितीची मासिक सभा संपन्न; विविध विभागांचा आढावा, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

फलटण ( आपलं फलटण)
पंचायत समिती फलटणची मासिक सभा नुकतीच पं.स.च्या सभागृहात सभापती शिवांजली भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेच्या प्रारंभी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.
यानंतर शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम, पशुसंवर्धन व एकात्मिक बालविकास सेवा योजनांसह विविध विभागांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः रस्ते व स्वच्छता या मूलभूत सुविधांवर अधिक भर देण्याचे ठरविण्यात आले. प्रत्येक गावापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय ठेवण्यावरही भर देण्यात आला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायतींचे मूल्यमापन सुरू असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
“माझे गाव आरोग्य संपन्न गाव” या अभियानाबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कोंडके यांनी मार्गदर्शन करत सर्व सदस्य व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.
“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमात जिल्हा परिषद व खासगी शाळांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांचे अभिनंदन करण्यात आले.
सभेचे कामकाज सभापती शिवांजली भोसले, उपसभापती अमोल सस्ते, सदस्य तसेच गटविकास अधिकारी प्रकाशकुमार बोंबले यांच्या उपस्थितीत पार पडले.

Spread the love
  • Related Posts

    फलटणात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ ८ मे रोजी

    फलटण (आपलं फलटण) शहरातील सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विभाग तसेच इतर शासकीय विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण व्हावे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा या…

    Spread the love

    सेवाहक्क दिनानिमित्त फलटण तालुक्यात जनजागृती उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे :तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव  65000 प्रमाणपत्रांचे केले वितरण

    फलटण (आपलं फलटण) सेवाहक्क दिनानिमित्त फलटण तालुक्यात विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले आहे.सेवाहक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
    error: Content is protected !!