प्रधानमंत्री आवास योजना २.० चा लाभ घ्या; नगराध्यक्ष समशेरसिंह ना.निंबाळकर

फलटण ( आपलं फलटण)
शहरातील सर्वसामान्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत फलटण नगरपरिषदेकडे लाभार्थी नेतृत्व बांधकाम (BLC) घटकातून २१० अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी ९९ घरकुलांना गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून मंजुरी देण्यात आली आहे.
मंजूर लाभार्थ्यांना एकूण ३५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले असून, घरकुल उभारणीस गती मिळत आहे. फलटण शहरासाठी या योजनेअंतर्गत एकूण १२३० घरकुलांचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील जास्तीत जास्त पात्र व इच्छुक नागरिकांनी या घरकुल योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे. नागरिकांनी शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घेत स्वतःचे घराचे स्वप्न साकार करावे, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, योजनेविषयी अधिक माहितीसाठी नागरिकांनी फलटण नगरपरिषदेमधील प्रधानमंत्री आवास योजना कक्षास भेट द्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी निखील जाधव यांनी केले आहे.

Spread the love
  • Related Posts

    विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक पर्वाची मेजवानी!लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा गोंधळ; भव्य दांडिया स्पर्धा अन् आकर्षक बक्षिसांची पर्वणी

    आपलं फलटण : (विडणी प्रतिनिधी) शारदीय नवरात्रोत्सव २०२६ निमित्त विडणी येथे माता-भगिनींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेले लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा…

    Spread the love

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!