विडणीतील श्री कालभैरवनाथ यात्रा भक्तीभाव, परंपरा आणि उत्साहात दिमाखात संपन्न

विडणी ( योगेश निकाळजे)
विडणी येथील ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ व जोगेश्वरी देवीची वार्षिक यात्रा यंदा ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागातून अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. धार्मिक विधी, पारंपरिक रूढी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा संगम साधत ही यात्रा गावाच्या सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवणारी ठरली.
यात्रेचा शुभारंभ मंगळवार, दि. १४ एप्रिल रोजी श्री कालभैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांच्या हळद समारंभाने झाला. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यात ग्रामस्थांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला. गावात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.
बुधवार, दि. १५ रोजी सायंकाळी ७ वाजता मानकरी शेंडे कुटुंबियांच्या हस्ते वाजतगाजत श्री कालभैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांना गावातून मिरवणुकीने मंदिरात आणण्यात आले. त्यानंतर विधीवत देव-देवतांचा विवाह सोहळा पार पडला. या प्रसंगी पारंपरिक उखाण्यांच्या कार्यक्रमाने विशेष रंगत आणली. गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वातावरण आनंदमय केले.
यानंतर यात्रा समितीच्यावतीने महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विजेत्या महिलांना पैठणी, आटाचक्की, सोन्याची नथ, कुलर, एलईडी टीव्ही, वॉटर फिल्टर आदी आकर्षक बक्षिसांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
गुरुवार, दि. १६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून भाविकांनी श्री कालभैरवनाथाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. सायंकाळी ६ वाजल्यापासून मानाच्या सासनकाठ्यांची गावातून वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात या काठ्या मंदिरात दर्शनासाठी आणण्यात आल्या. त्यानंतर मानकरी नाळे कुटुंबियांच्या वतीने देवास कुसुंबाचा नैवेद्य दाखवण्यात आला.
रात्री १० वाजता नृत्यांगना हिंदवी पाटील यांच्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर रात्री १२ वाजता श्रींचा महाअभिषेक करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून भक्तिभावाने दर्शन घेतले.
शुक्रवार, दि. १७ रोजी पहाटे ५ वाजता श्री कालभैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांच्या पालखीचा (छबिना) सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. वाजतगाजत काढलेल्या या पालखी सोहळ्याने संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. सकाळी १० वाजता भिका-भिमा यांच्या लोकनाट्य तमाशाने ग्रामस्थांचे मनोरंजन केले.
सायंकाळी ५ वाजल्यापासून जंगी कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला. या आखाड्यात नामांकित मल्लांनी सहभाग घेत दमदार झुंजी सादर केल्या. कुस्तीप्रेमींनी मोठ्या उत्साहात या स्पर्धांचा आनंद घेतला. विजेत्या मल्लांना यात्रा समितीच्या वतीने आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या सर्व कार्यक्रमांमुळे विडणीतील श्री कालभैरवनाथ यात्रा ही केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक एकात्मता, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करणारा भव्य उत्सव ठरला. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे ही यात्रा यशस्वीपणे आणि उत्साहात संपन्न झाली.

Spread the love
  • Related Posts

    विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक पर्वाची मेजवानी!लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा गोंधळ; भव्य दांडिया स्पर्धा अन् आकर्षक बक्षिसांची पर्वणी

    आपलं फलटण : (विडणी प्रतिनिधी) शारदीय नवरात्रोत्सव २०२६ निमित्त विडणी येथे माता-भगिनींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेले लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा…

    Spread the love

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!