पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती

आपलं फलटण प्रतिनिधी

सभापती भोसले म्हणाल्या, पालखी मार्गावरील तरडगाव, फलटण व बरड येथे मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य विभागाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ६ शासकीय व ६६ खासगी अशा एकूण ७२ वैद्यकीय संस्था, ६३३ खाटांची व्यवस्था तसेच ५० विलगीकरण कक्ष सज्ज ठेवण्यात आले आहेत.

भाविकांच्या आपत्कालीन उपचारासाठी ३ रुग्णवाहिका (१०२), ३ रुग्णवाहिका (१०८) तसेच ४६ फिरती वैद्यकीय पथके (आरोग्यदूत/दुचाकी स्वार) पालखी मार्गावर तैनात करण्यात येणार आहेत. एकूण ६५ वैद्यकीय मदत पथकांद्वारे पालखी मार्गावर सातत्याने आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे.

आरोग्य विभागाने दोन ठिकाणी २४ तास नियंत्रण कक्ष सुरू केले असून जिल्हा परिषद सातारा व उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे नागरिकांना आवश्यक माहिती व मदत उपलब्ध होणार आहे. पालखी मार्गावर आरोग्य विभागाचे बॅनर, फ्लेक्स, जनजागृती साहित्य, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड तसेच आरोग्यदूतांच्या दुचाकींवर विशेष स्टिकर्सद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा निर्विघ्न, सुरक्षित आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम वातावरणात पार पडावा, यासाठी आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून भाविकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण करण्यात आल्याचे सभापती शिवांजली भोसले यांनी स्पष्ट केले.

Spread the love
  • Related Posts

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर…

    Spread the love

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण प्रांत कार्यालयाशी संबंधित काम करून देण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी कारवाई केल्याची माहिती समोर आली…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    कथालेखनाला मिळणार योगेश सोमण, प्रमोद पवार यांचे मार्गदर्शन व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार व शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साताऱ्यात कार्यशाळा; नवोदित लेखकांसाठी सुवर्णसंधी

    error: Content is protected !!