श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

आपलं फलटण प्रतिनिधी :

साखरवाडी येथील श्रीदत्त इंडिया प्रा. लि. साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी आयोजित मोळीपूजन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदाच्या हंगामात उच्चांकी गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी आवश्यक यंत्रणा, तोडणी आणि वाहतूक व्यवस्था सज्ज झाली आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली.

विधान परिषदचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महंत विद्यान श्याममुंदरशास्त्री, श्रीदत्त इंडिया उद्योगाचे चेअरमन प्रतीक उपळकर आणि संचालक जितेंद्र धायगुडे यांच्यासह कारखान्याचे संचालक चेतन धार, परीक्षित रुपारेल आणि करण रुपारेल यांच्या उपस्थितीत मोळीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवरांनी गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कारखान्याच्या विस्तारीकरणानंतर यंदा गाळप क्षमता वाढली असून, वाढीव क्षमतेनुसार गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे. ऊस तोडणी, वाहतूक आणि इतर आवश्यक बाबींची तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे कारखाना सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होणार आहे.
श्रीदत्त इंडिया ही कंपनी अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला ऊस वेळेत गाळपासाठी आणणे आणि त्यांना सहकार्य करणे, याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. यंदाचा हंगाम शेतकरी, ऊसतोडणी कामगार आणि कारखान्यासाठी समाधानकारक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन नितीन भोसले, व्हाइस प्रेसिडेंट भारत तावरे, चांदोबा साखर कारखान्याचे टेक्निकल युनिट हेड अमोद पाल, केन मॅनेजर सदानंद पाटील, दिवाकर माने, रमेश बाणगवार, एचआर संजय भुसनार, नितीन नाईकनवरे, डीजीएम अजित कदम, डेप्युटी चीफ इंजिनिअर किशोर फडतरे, नितीन रणवरे, विशाल साखरे, नितीन होळे, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे राजेंद्र भोसले, पोपट भोसले, संतोष भोसले, महेश भोसले, राजेंद्र गायकवाड, केन यार्ड इन्चार्ज एस. के. भोसले, ट्रान्सपोर्ट इन्चार्ज नितीन भोसले, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, सुरक्षा अधिकारी अजय कदम, सुरेश नाना भोसले, संजय जाधव, मातोश्री कन्स्ट्रक्शनचे संजय भोसले, जयराम नाना भोसले, सुरेश भोसले यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Spread the love
  • Related Posts

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    आपलं फलटण | फलटण प्रतिनिधीफलटण : दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!