फलटण तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत; शेतकरी हवालदिल.बिबट्या, रानडुक्कर हल्ल्यांमुळे पिकांचे व पशुधनाचे मोठे नुकसान; आमदार सचिन पाटील यांची विधानसभेत आक्रमक मागणी

फलटण (आपलं फलटण)फलटण-कोरेगाव मतदारसंघात वन्य प्राण्यांच्या वाढत्या दहशतीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आमदार सचिन पाटील यांनी विधानसभेत केली.
तालुक्यात बिबट्या आणि रानडुकरांनी ठिकठिकाणी उच्छाद मांडला आहे. रानडुकरांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान होत असून बिबट्यामुळे पशुधन धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, परिसरात पूर्वी कधीही न दिसणाऱ्या रानगव्याने २७ तारखेला विडणी येथील एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विधानसभेत तसेच वनमंत्र्यांकडे केलेल्या मागणीत आमदार पाटील यांनी सांगितले की, एकट्या फलटण तालुक्यात रानडुकरांमुळे आतापर्यंत 25ते 30 पशुधनांचा बळी गेला आहे. यावर्षी सुमारे 350 शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.नुकसानीचे पंचनामे होत असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना तातडीची व पुरेशी आर्थिक मदत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
मतदारसंघातील वेळोशी, वाघोशी, धुमाळवाडी, बोडकेवाडी, गिरवी, उपळवे, ताथवडे या डोंगरकपारीतील गावांमध्ये वन्य प्राण्यांचा अधिकचा वावर आहे. शेतकरी शेतात जाण्यासही घाबरत आहेत. कष्टाने उभे केलेले पीक रातोरात उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे.
डोंगराळ भागातील शेतीभोवती तातडीने सोलर झटका पंप उपलब्ध करून द्यावेत, तसेच डोंगरकडेला खोल चर खोदून रानडुकरांचा प्रवेश रोखावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. ज्या भागात नुकसानीचे प्रमाण अधिक आहे, त्या ठिकाणी वनक्षेत्राला कायमस्वरूपी कुंपण घालणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
2025-26 या कालावधीत बिबट्याने पशुधनावर हल्ला केल्याची सात प्रकरणे नोंदली गेली असून वन विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांना 82 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. मात्र ही मदत अपुरी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्र प्रमाणेच जिल्ह्यात स्वतंत्र बिबट निवारा केंद्र स्थापन करावे, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.
वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव, अपुरी नुकसानभरपाई आणि संरक्षणाच्या उपाययोजनांचा अभाव यामुळे फलटण-कोरेगाव परिसरातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.हा ज्वलंत प्रश्न आमदार सचिन पाटील यांनी विधानसभेत मांडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Spread the love
  • Related Posts

    विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक पर्वाची मेजवानी!लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा गोंधळ; भव्य दांडिया स्पर्धा अन् आकर्षक बक्षिसांची पर्वणी

    आपलं फलटण : (विडणी प्रतिनिधी) शारदीय नवरात्रोत्सव २०२६ निमित्त विडणी येथे माता-भगिनींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेले लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा…

    Spread the love

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!