दि. यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेत आर्थिक गैरव्यवहार; ठेवीदारांना पुढे येण्याचे आवाहन

फलटण (आपलं फलटण) : येथील दि. यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक लि., शाखा कराड (जि. सातारा) येथे झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित ठेवीदार व गुंतवणूकदारांनी पुढे येऊन जबाब नोंदवावेत, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून व्यवहारांचा विस्तार सातारा, सोलापूर, पुणे, सांगली आणि लातूर जिल्ह्यांपर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कराड शाखेत गुंतवणूक किंवा आर्थिक व्यवहार केलेल्या सर्वांनी आवश्यक कागदपत्रांसह पुढे येणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मूळ ठेव पावत्या व ठेवींचे पुरावे
पासबुक, व्यवहार नोंदी व बँक स्टेटमेंट्स
बँकेशी झालेला पत्रव्यवहार
ओळखपत्र व आधार कार्डाच्या प्रती
गुंतवणुकीशी संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन गुंतवणूकदाराने पोलीसाची संपर्क साधावा
सदर प्रकरणाच्या तपासासाठी दि. ४ मार्च २०२६ ते दि. ३१ मार्च २०२६ या कालावधीत सकाळी १० ते दुपारी २.३० या वेळेत सातारा पोलिस अधीक्षक कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या आर्थिक गैरव्यवहारामुळे फलटणसह परिसरात खळबळ उडाली असून ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दोषींवर कठोर कारवाई करून ठेवीदारांना न्याय मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Spread the love
  • Related Posts

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    ग्राम सुरक्षा यंत्रणेला निधीअभावी कुलूप; ३० जूनपासून सेवा बंदसातारा जिल्ह्यातील सुमारे साडेनऊ लाख ग्रामस्थांवर परिणाम; आपत्कालीन सूचना व्यवस्थेवर संकट

    फलटण (आपलं फलटण प्रतिनिधी )ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना, आपत्ती व्यवस्थापन, गुन्हे प्रतिबंध, शासकीय योजनांची माहिती आणि ग्रामपंचायतींचे महत्त्वाचे संदेश तात्काळ पोहोचविणारे प्रभावी माध्यम ठरलेली ग्राम सुरक्षा यंत्रणा निधीअभावी येत्या…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!