घोड्याच्या यात्रेत फलटणकर भक्तिरसात चिंब मान्यवरांच्या हस्ते झाले पालखीपूजन

फलटण (आपलं फलटण) महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलटण येथे श्री चक्रपाणी वार्षिक यात्रेतील (घोड्याची यात्रा) मुख्य दिवस मंगळवारी उत्साहात साजरा झाला. ढोल-ताशे, लेझीम व बेंजोच्या गजरात “गोपालकृष्ण महाराज की जय” आणि “श्री चक्रपाणी स्वामींच्या नावाचा जयघोष” करत गुलालाच्या उधळणीत श्रींच्या पालखीसह मानाच्या पितळी घोड्यांची भव्य ग्रामप्रदक्षिणा पार पडली.
यात्रेनिमित्त फलटण येथील श्रीकृष्णनाथ, आबासाहेब, बाबासाहेब, जन्मस्थान (अवस्थान मंदिर), रंगशीळा व श्रीदत्त या सहा मंदिरांमध्ये राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, राजस्थान व गुजरात येथून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती. चैत्र पौर्णिमेपासून (दि. २ एप्रिल) सुरू झालेल्या या यात्रेत दररोज अभिषेक, गीता पठण, प्रवचन व उपहार असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. दरम्यान, २ ते ६ एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी श्रीकृष्णनाथ मंदिरातून निघणारा छबिना आबासाहेब मंदिरात वाद्यांच्या निनादात दाखल होत होता.
मंगळवारी दुपारी आबासाहेब मंदिर येथे आ. सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक अशोकराव जाधव, संदीप चोरमले, नगरसेविका कु. सिध्दाली शहा, माजी नगरसेवक अनुप शहा, सुदामराव मांढरे, तसेच अजितराव जगताप आदी मान्यवरांच्या हस्ते महास्थान व पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय महानुभाव परिषद माजी अध्यक्ष तथा श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प. पू. आचार्य श्यामसुंदर शास्त्री विद्वांस, प. पू. सुदामराज बाबा, बाळासाहेब ननावरे, प. पू. मुरलीधरबुवा, प. पू. गोटू बुवाजी आदींसह पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूजन व आरतीनंतर दुपारी 1.30 वा.पालखी नगरप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाली. पालखीपुढे मानकरी डोक्यावर पितळी घोडे घेऊन सहभागी झाले होते. “श्री चक्रधर स्वामी, श्री गोविंदप्रभू, श्री दत्तात्रेय प्रभू, श्री चक्रपाणी महाराज” यांच्या जयघोषात वातावरण दुमदुमले होते. अनेक भक्तांनी पालखीसमोर लोटांगण घेत भक्तिभाव व्यक्त केला.
यात्रेनिमित्त मंदिर परिसरात मेवा-मिठाई, खेळणी, नारळ व पूजासाहित्याची दुकाने थाटण्यात आली होती. विविध तरुण मंडळे, गणेशोत्सव मंडळे व सामाजिक संस्थांकडून भाविकांसाठी थंड पिण्याचे पाणी, सरबत, ताक, मठ्ठा तसेच नाश्त्याची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. काही ठिकाणी भोजनाचीही सोय करण्यात आली होती.
दरम्यान, संपूर्ण यात्रा भक्तिपूर्ण वातावरणात शांततेत पार पडली. नगर परिषदेकडून स्वच्छता व पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता.

Spread the love
  • Related Posts

    विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक पर्वाची मेजवानी!लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा गोंधळ; भव्य दांडिया स्पर्धा अन् आकर्षक बक्षिसांची पर्वणी

    आपलं फलटण : (विडणी प्रतिनिधी) शारदीय नवरात्रोत्सव २०२६ निमित्त विडणी येथे माता-भगिनींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेले लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा…

    Spread the love

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!