मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन; गरजूंसाठी शस्त्रक्रिया सवलतीत

फलटण (आपलं फलटण) लायन्स क्लब फलटण संचलित लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटल यांच्या वतीने परिसरातील गरजू नागरिकांसाठी सोमवार, दि. १३ एप्रिल २०२६ रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा जनहितार्थ उपक्रम माळजाई मंदिर परिसरातील नेत्र तपासणी केंद्र येथे सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांची मोफत तपासणी केली जाणार असून, मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मोफत तर इतरांसाठी अत्यंत सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रुग्णालयात PHACO (सूक्ष्मछेद पद्धत) तसेच SICS पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याची सोय आहे.
याशिवाय, डायबेटिक रेटिनोपॅथी तपासणी, पेरिमेट्री, बी-स्कॅन, OCT आणि फंडस कॅमेरा यांसारख्या आधुनिक यंत्रणांद्वारे नेत्ररोगांचे निदान व उपचारही करण्यात येणार आहेत.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लायन अर्जुन घाडगे (चेअरमन), लायन चंद्रकांत कदम (सचिव), लायन महेश साळुंखे (अध्यक्ष, लायन्स क्लब फलटण) तसेच व्यवस्थापन समितीने केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधितांनी रुग्णालयाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Spread the love
  • Related Posts

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी: शिक्षण क्षेत्रात गेली दोन दशके उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या वडले, फलटण येथील सौ. संजीवनी संपत सोनवलकर यांना ग्लोबल इलाइट मीडिया टेक, पुणे…

    Spread the love

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण-पंढरपूर महामार्गावरील राजुरी चौफुला कुरवली पाटी ता. फलटण येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला आय-ट्वेंटी कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मंगल विठ्ठल साठे (वय 42…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
    error: Content is protected !!