फलटण (आपलं फवटण) रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अतुल शहा, इम्रान सय्यद, खजिनदार कैफ शेख, सचिव मारुती टकले तसेच संचालिका माया बनसोडे, प्रीती शहा, रझिया शेख व अनिसा सय्यद उपस्थित होते. कार्यक्रमात फुले यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या सामाजिक विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.






