प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगर बीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त

प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगर
बीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त
आपलं फलटण( प्रतिनिधी )
फलटण पंचायत समितीचा कारभार सध्या पूर्णपणे प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर सुरू असून, महत्त्वाच्या पदांवरील रिक्त जागांमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच पशुधन विकास अधिकारी विस्तार यांसारखी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने विकासकामे, शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकास यंत्रणेवर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
Bविशेष म्हणजे गटविकास अधिकारी आणि सहाय्यक गटविकास अधिकारी ही दोन्ही महत्त्वाची पदे सध्या रिक्त असून त्यांचा अतिरिक्त कार्यभार खंडाळा येथील सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाशकुमार बोंबले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे एका अधिकाऱ्यावर दोन महत्त्वाच्या पदांची जबाबदारी पडल्याने प्रशासकीय निर्णय प्रक्रियेवर ताण निर्माण होत आहे.
शिक्षण विभागातही परिस्थिती वेगळी नाही. गटशिक्षणाधिकारी पद बऱ्याच कालखंडापासून रिक्त असून त्याचा अतिरिक्त कार्यभार विस्तार अधिकारी यांच्याकडे आहे. हा कार्यभार एका विस्ताराधिकाऱ्याकडून दुसऱ्या विस्तार अधिकाऱ्याकडे गेला गेला परंतु स्वतंत्र गटशिक्षण अधिकाऱ्याची नियुक्ती का नाही? हा प्रश्न विचारला जात आहे. स्वतंत्र गटशिक्षणाधिकारी नसल्याने प्राथमिक शिक्षण विभागातील नियोजन, शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रशासकीय समन्वयावर परिणाम होत असल्याची चर्चा शिक्षक व पालकांमध्ये आहे.
तालुका आरोग्य अधिकारी पद रिक्त असल्याने आरोग्य विभागाचा कारभार साखरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. बालविकास प्रकल्प अधिकारी (प्रकल्प क्रमांक २) पद रिक्त असून त्याचाही कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्यास सांभाळावा लागत आहे. पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पदही रिक्त असून त्याची जबाबदारी डॉ. फाळके सांभाळत आहेत.
बदलीने तथा सेवानिवृत्तीने डायरेक्ट झालेल्या जागेवर नवीन अधिकारी किंवा नवनियुक्त अधिकारी यांची नियुक्ती होत नसल्याने दिवसेंदिवस रिक्त पदाचा भार वाढता वाढता वाढतच आहे.यामध्ये 30 जून अखेर आणखी भर पडणार असून पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील उपअभियंता (बांधकाम) तसेच उपअभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) हे दोन्ही अधिकारी ३० जून २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे पंचायत समितीतील प्रभारी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
फलटण तालुका हा जिल्ह्यातील मोठ्या आणि संवेदनशील तालुक्यांपैकी एक मानला जातो. ग्रामपंचायती, विविध शासकीय योजना, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण तसेच ग्रामीण विकासाच्या अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी सक्षम अधिकारी यंत्रणेवर अवलंबून असते. मात्र, सातत्याने रिक्त राहणाऱ्या पदांमुळे विकासकामांना अपेक्षित गती मिळत नसल्याची नाराजी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
पंचायत समितीतील मंजूर पदांच्या तुलनेत कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने अनेक विभागांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. परिणामी फाईल निकाली काढण्यास विलंब, योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे आणि नागरिकांच्या कामांमध्ये दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
फलटणच्या विकासाला गती देण्यासाठी तसेच प्रशासनात सुसूत्रता आणण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी आता नागरिक, शिक्षक, कर्मचारी आणि विविध सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे. अन्यथा आगामी काळात पंचायत समितीचा कारभार अधिकच प्रभारी अधिकाऱ्यांच्या आधारे चालणार असून त्याचे परिणाम विकासकामांवर आणि सर्वसामान्य नागरिकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे!
फलटण पंचायत समितीतील गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांसह अनेक महत्त्वाची पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाचा गाडा प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर चालत असून विकासकामे, शिक्षण व आरोग्य सेवांवर परिणाम होत आहे. विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर,माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सचिन कांबळे-पाटील यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून फलटणसाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी पुढाकार घ्यावा, अशी जनतेची जोरदार मागणी आहे. सक्षम अधिकारी यंत्रणेशिवाय विकासाला गती मिळणे अशक्य असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Spread the love
  • Related Posts

    विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक पर्वाची मेजवानी!लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा गोंधळ; भव्य दांडिया स्पर्धा अन् आकर्षक बक्षिसांची पर्वणी

    आपलं फलटण : (विडणी प्रतिनिधी) शारदीय नवरात्रोत्सव २०२६ निमित्त विडणी येथे माता-भगिनींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेले लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा…

    Spread the love

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!