गाळप क्षमतेत वाढीचा निर्धार; शरयु साखर कारखान्यात ऊस तोडणी-वाहतूक कराराचा शुभारंभ

फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा)
येथील शरयु साखर कारखाना आगामी २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी सज्ज होत असून, ऊस तोडणी व वाहतूक कराराचा शुभारंभ आज कारखाना परिसरात समारंभपूर्वक करण्यात आला. वाहन ठेकेदारांच्या हस्ते पार पडलेल्या या सोहळ्याने हंगामाच्या तयारीला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
कारखान्याच्या व्यवस्थापनाने यंदाच्या हंगामात गाळप क्षमतेत लक्षणीय वाढ करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. कार्यकारी संचालक युगेंद्रदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सुमारे १२ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यानुसार नियोजनबद्ध हालचाली सुरू आहेत.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रासह लगतच्या भागातील ऊस नोंदणीचे काम शेती विभागामार्फत वेगाने सुरू असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला ऊस शरयु साखर कारखान्याकडे नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर ऊस तोडणी व वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, सातारा-फलटण मार्गावरील रखडलेले रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीसाठी मार्ग मोकळा झाला आहे. परिसरातील इतरही रस्ते सुधारल्याने ऊस वाहतूक अधिक सुसूत्र होणार असून, वेळेची बचत आणि कार्यक्षमतेत वाढ होणार आहे.
शेती विभागाने स्थानिक वाहनधारकांनाही आवाहन केले असून, त्यांनी वाहतूक करार करून या गळीत हंगामात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे सांगितले आहे.
या कार्यक्रमास संचालक अविनाश भापकर, युनिट हेड विजय जगदाळे, शेती अधिकारी अशोक घाडगे, रमेश वाघ, डॉ. गणपत सावंत यांच्यासह कारखान्याचे विभाग प्रमुख, ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
  • Related Posts

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगर बीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त

    प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगरबीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त आपलं फलटण( प्रतिनिधी )फलटण पंचायत समितीचा…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
    error: Content is protected !!