देवळात भक्ताला मार, दरबारात भोंदूबाबाला मान” — दांभिकतेच्या उन्मादावर साहित्यिकांचा घणाघात३७ व्या साहित्यिक संवादात परखड शब्दांत समाजमनाला आरसा

फलटण( आपलं फलटण)
श्रद्धेच्या पवित्र नावाखाली सुरू असलेल्या दांभिकतेच्या उन्मादाने समाजमन अस्वस्थ झाले असून, ज्योतिबा डोंगर व नाईकबा डोंगरावरील धक्कादायक घटनांच्या पार्श्वभूमीवर फलटण येथे झालेल्या ३७ व्या साहित्यिक संवादात साहित्यिकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत या प्रवृत्तीवर जोरदार हल्लाबोल केला.
मंदिरातच भक्ताला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, तर दुसरीकडे भोंदूबाबांच्या चरणी राजकीय नेत्यांची नतमस्तक वृत्ती—या विरोधाभासातून समाजातील दुटप्पीपणा चव्हाट्यावर आल्याची भावना व्यक्त करण्यात आली. “दांभिकतेचा उन्माद” या विषयावर झालेल्या या संवादात वास्तवाला भिडणारे विचार मांडले गेले.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे कार्यकर्ते डॉ. सुधीर इंगळे यांनी शिक्षित व सक्षम घटकच अशा प्रवृत्तींचे पोषण करत असल्याचा थेट आरोप करत, “ही प्रवृत्ती आपल्या मानसिकतेतील दोषांचे प्रतिबिंब आहे. बदल हवा असेल, तर विचारसरणी बदलावी लागेल,” असा स्पष्ट इशारा दिला.
माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी अस्वस्थ काळात साहित्यिकांनी गप्प न बसता लेखणी उगारण्याचे आवाहन करत, “जग अस्थिरतेत ढकलले जात असताना आपण मात्र बुवाबाजीला खतपाणी घालत आहोत. सत्य मांडण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे,” असे ठणकावले.
प्रा. श्रेयस कांबळे यांनीही दांभिकतेच्या वाढत्या उन्मादाबद्दल चिंता व्यक्त करत कठोर कारवाईची गरज अधोरेखित केली. “सामाजिक स्वास्थ्य टिकवायचे असेल, तर लेखणीनेच या प्रवृत्तीवर प्रहार झाला पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आप्पा तांबे यांनी ‘तरडगावचा आप्पा’ या कथेद्वारे ग्रामीण भागातील बुवाबाजीचे वास्तव जिवंत करत उपस्थितांना विचार करायला भाग पाडले.
या वेळी माधुरी जगदाळे, सविता तांबे, प्रमोद सस्ते, आप्पासाहेब तांबे, प्रा. विकास शिंदे, राजाभाऊ काकडे, सचिन जाधव, महादेव गायकवाड, योगेश जगदाळे, अनिल सोनवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love
  • Related Posts

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…

    Spread the love

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!