जि.प. सभापती निवडीसाठी कडेकोट बंदोबस्त; मागील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क

सातारा (आपलं फलटण) सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण, महिला व बालकल्याण तसेच इतर दोन विषय समित्यांच्या सभापती पदासाठी ४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या दुसऱ्या विशेष सभेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. मागील अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी घडलेल्या गोंधळाच्या घटनांचा धडा घेत यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत आदेश जारी करत जिल्हा परिषद इमारतीच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. हे निर्बंध शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून सभा संपेपर्यंत लागू राहणार आहेत.
 2     विशेष म्हणजे, यापूर्वी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या वेळी जिल्हा परिषद परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. घोषणाबाजी, ढकलाढकली तसेच तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता. सदर घटनाक्रमाचे विधानसभा व विधान परिषदेत जोरदार पडसाद उमटले होते.आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. घटनेला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाच्या कारवाईवरून सत्ताधारीत आमने सामने आले होते. निलंबनासाठी शिवसेना राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली होती तर भारतीय जनता पक्षाने तडकाफडकीच्या निलंबनाला विरोध दर्शवित निलंबनाच्या कारवाईला स्थगिती दिली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यावेळी कोणतीही ढिलाई न करता आधीच कठोर उपाययोजना केल्या आहेत.
    नवीन आदेशानुसार, केवळ नवनिर्वाचित सदस्य, शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी यांनाच परिसरात प्रवेश दिला जाणार असून इतर सर्वांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकतेने पार पडावी, यासाठी पोलीस यंत्रणा पूर्ण क्षमतेने तैनात करण्यात आली असून प्रशासनाच्या या निर्णयामुळे संभाव्य तणाव टाळण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Spread the love
  • Related Posts

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…

    Spread the love

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!