मुधोजीराजे प्रज्ञाशोध परीक्षा उपक्रम यशस्वी; ७६ विद्यार्थ्यांचा गौरव

फलटण (आपलं फलटण )फलटण एज्युकेशन सोसायटीतर्फे राबविण्यात येणारी मुधोजीराजे प्रज्ञाशोध परीक्षा (माध्यमिक विभाग) हा उपक्रम यशस्वी ठरत असून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा उपक्रम म्हणून तो लौकिक मिळवत आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त बुद्धिमत्ता विकसित करून स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने ही परीक्षा सुरू करण्यात आली आहे.
मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे नुकत्याच झालेल्या बक्षीस वितरण समारंभात इयत्ता ५वी ते ९वीमधील सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांमधून निवडलेल्या ७६ गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हेमंत रानडे होते, तर नूतन शिंदे, वसुंधरा नाईक निंबाळकर, डॉ. पुरुषोत्तम राजवैद्य, दिलीप राजगुडा, मुख्याध्यापक वसंत शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशासन अधिकारी अरविंद निकम यांनी सांगितले की, या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून वाढता प्रतिसाद व विद्यार्थ्यांचे यश उत्साहवर्धक आहे. ‘ना नफा’ तत्त्वावर सुरू केलेला हा उपक्रम आज यशस्वी ठरल्याचे समाधान असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक मनोज कदम यांनी केले, तर सूत्रसंचालन तृप्ती शिंदे व सुजित जमदाडे यांनी केले.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सेक्रेटरी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम यशस्वी ठरल्याचे सांगण्यात आले. पुढील काळात ही परीक्षा जिल्हास्तरावर घेण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

Spread the love
  • Related Posts

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    आपलं फलटण प्रतिनिधीसातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक, साहित्यप्रेमी व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व कै. प्रा. रमेश तुकाराम आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.००…

    Spread the love

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    आपलं फलटण प्रतिनिधी भारतीय शेती एका नव्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभी आहे. वाढते उत्पादन, बदलते हवामान, रासायनिक अवशेषांबाबत वाढती जागरूकता आणि निर्यातीसाठी अधिक कठोर होत जाणारे कमाल अवशेष मर्यादा (एम.आर.एल.) निकष…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी

    फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

    पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती

    पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज     भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : फलटण शहरात विशेष वाहतूक आराखडा जाहीर१७ व १८ जुलै रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : फलटण शहरात विशेष वाहतूक आराखडा जाहीर१७ व १८ जुलै रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन
    error: Content is protected !!