सुरवडीतील ट्रान्सफॉर्मरचा प्रश्न ऐरणीवर; १०० केव्ही क्षमतेच्या नवीन ट्रान्सफॉर्मरची शेतकऱ्यांची मागणी

फलटण(आपलं फलटण प्रतिनिधी)
सुरवडी( ता. फलटण )गावच्या १५ फाटा परिसरातील काळू-बाळू वस्ती येथे असलेला ६५ केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर अपुरा पडत असल्याने शेतकरी व नागरिकांना वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाढत्या वीज वापराच्या तुलनेत ट्रान्सफॉर्मरची क्षमता कमी पडत असल्याने तांत्रिक बिघाड वाढले असून ट्रान्सफॉर्मर जळण्याच्या घटनाही घडत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
परिसरातील शेतकरी व वीज ग्राहक गेल्या तीन वर्षांपासून १०० केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी करत आहेत. मात्र अद्यापही संबंधित विभागाकडून या मागणीची दखल घेण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सदर ट्रान्सफॉर्मरवर शेतीपंप, घरगुती वीज वापर तसेच इतर अनेक जोडण्या असल्याने त्यावर अतिरिक्त भार येत आहे. परिणामी वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन शेतीची कामे विस्कळीत होत आहेत. तसेच दैनंदिन जीवनावरही त्याचा परिणाम होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, माढा लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी २०२३ मध्ये या ठिकाणी १०० केव्ही क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. मात्र त्यानंतरही प्रस्तावावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
महावितरण प्रशासनाने तातडीने या प्रश्नाची दखल घेऊन १०० केव्ही क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा सुरवडी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी दिला आहे.
चौकट : तीन वर्षांपासून मागणी प्रलंबित
सुरवडीच्या काळू-बाळू वस्ती परिसरातील वीज ग्राहकांनी गेल्या तीन वर्षांपासून १०० केव्ही ट्रान्सफॉर्मरची मागणी लावून धरली आहे. मात्र अद्यापही प्रशासकीय पातळीवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Spread the love
  • Related Posts

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…

    Spread the love

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!