आरोग्यम् धनसंपदा; कृषीकन्यांकडून योगदिनाचे महत्त्व विशद

फलटण(आपलं फलटण प्रतिनिधी) फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त व ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रमांतर्गत मठाचीवाडी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, फलटणच्या चतुर्थ वर्षातील कृषीकन्यांनी योगाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना विविध योगप्रकारांचे प्रात्यक्षिक दाखविले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मठाचीवाडी येथे आयोजित कार्यक्रमात शिक्षक, कृषीकन्या व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी योग दिनाचे महत्त्व विशद करण्यात आले. तसेच सूर्यनमस्कार, ध्यान, विविध योगासने व प्रार्थना यांचे आयोजन करण्यात आले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमात कृषीकन्या साक्षी नाझीरकर, श्रावणी भागवत, मोनाली कोळपे, अस्मिता नेवसे, गौरी जाधव, जोगेश्वरी लोकरे व विद्या नवले यांनी सक्रिय सहभाग घेतला. शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर, प्राध्यापिका क्षितिजा देशमुख, सुवर्णा पाठक तसेच इतर शिक्षक उपस्थित होते.
या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. ए. पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. एम. एस. धालपे तसेच प्रा. एस. एम. साळुंखे व प्रा. जी. बी. अडसूळ यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागात योगाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

Spread the love
  • Related Posts

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    आपलं फलटण प्रतिनिधीसातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक, साहित्यप्रेमी व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व कै. प्रा. रमेश तुकाराम आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.००…

    Spread the love

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    आपलं फलटण प्रतिनिधी भारतीय शेती एका नव्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभी आहे. वाढते उत्पादन, बदलते हवामान, रासायनिक अवशेषांबाबत वाढती जागरूकता आणि निर्यातीसाठी अधिक कठोर होत जाणारे कमाल अवशेष मर्यादा (एम.आर.एल.) निकष…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी

    फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

    पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती

    पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज     भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : फलटण शहरात विशेष वाहतूक आराखडा जाहीर१७ व १८ जुलै रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : फलटण शहरात विशेष वाहतूक आराखडा जाहीर१७ व १८ जुलै रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन
    error: Content is protected !!