सेवाहक्क दिनानिमित्त फलटण तालुक्यात जनजागृती उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे :तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव  65000 प्रमाणपत्रांचे केले वितरण

फलटण (आपलं फलटण) सेवाहक्क दिनानिमित्त फलटण तालुक्यात विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले आहे.
सेवाहक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये तसेच ग्रामपंचायतींमध्ये विशेष सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभांमध्ये सेवाहक्क अधिनियम २०१५ मधील तरतुदींचे वाचन करून नागरिकांना त्यांच्या हक्कांची माहिती दिली जाणार आहे. यामुळे शासनाच्या विविध सेवा अधिक पारदर्शक आणि वेळेत उपलब्ध व्हाव्यात, हा उद्देश आहे.
याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार असून ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत विविध सेवा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
१ एप्रिल २०२५ ते ३० मार्च २०२६ या कालावधीत तालुक्यात एकूण ६५ हजार ३३५ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. यात उत्पन्न, अधिवास, जात, नॉनक्रिमिलियर, अल्पभूधारक, ज्येष्ठ नागरिक तसेच इतर विविध प्रमाणपत्रांचा समावेश आहे. सर्व सेवा निर्धारित कालावधीत देण्यावर प्रशासनाचा भर असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
नागरिकांना सेवा देताना कोणत्याही प्रकारचा विलंब, अतिरिक्त शुल्क आकारणी किंवा अडचणी येत असल्यास त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी, असेही आवाहन तहसीलदार डॉ. जाधव यांनी केले आहे.
सेवाहक्क दिनानिमित्त आयोजित या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love
  • Related Posts

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगर बीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त

    प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगरबीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त आपलं फलटण( प्रतिनिधी )फलटण पंचायत समितीचा…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    कथालेखनाला मिळणार योगेश सोमण, प्रमोद पवार यांचे मार्गदर्शन व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार व शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साताऱ्यात कार्यशाळा; नवोदित लेखकांसाठी सुवर्णसंधी

    error: Content is protected !!