फलटणात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ ८ मे रोजी

फलटण (आपलं फलटण) शहरातील सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विभाग तसेच इतर शासकीय विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण व्हावे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा या उद्देशाने प्रशासनाच्या वतीने फलटण येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
हे शिबीर शुक्रवार, दि. ८ मे रोजी सकाळी ११ वाजता बी.एस.एन.एल. कार्यालय शेजारील नगरपरिषद सभागृह येथे पार पडणार आहे.
या शिबिरामध्ये विविध महत्त्वाच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये ‘जिवंत ७/१२’ मोहिमेअंतर्गत वारस नोंद, लक्ष्मी मुक्ती, अपाक व एकत्रित नोंदी, ७/१२ व ८अ वाटप, सामाजिक अर्थसहाय्य योजनांसाठी अर्ज स्वीकृती व मंजुरी, तसेच तुकडेबंदी कायद्याविरोधातील व्यवहार व हस्तांतरणासंदर्भातील (अकृषिक जमिनी) गावनिहाय यादी तयार करण्यात येणार आहे.
याशिवाय मंडळ स्तरावरील शाळांमध्ये दाखले शिबिर आयोजित करून विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले वितरित केले जाणार असून, प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढण्यावर भर देण्यात येणार आहे. लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत उत्पन्न, रहिवासी/अधिवास, जात तसेच नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्रांसाठी अर्ज स्वीकारून त्यांचे वितरणही करण्यात येणार आहे.
भोगवटादार वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर, नवीन अकृषक तरतुदींविषयी मार्गदर्शन, भूसंपादनाशी संबंधित प्रकरणांची दप्तर अद्ययावत करणे, ई-मोजणीद्वारे प्रॉपर्टी कार्ड, नकाशे व वारस नोंदी वाटप, तसेच ‘अग्रीस्टॅक’ (फार्मर आयडी) आणि ‘पीएम किसान’ योजनांअंतर्गत लँड सीडिंग, आधार सीडिंग व ई-केवायसीची कामेही करण्यात येणार आहेत.
महसूल विभागासोबत इतर शासकीय कार्यालयांच्या सेवाही ‘एक खिडकी’ पद्धतीने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
सदर शिबिरात शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, महिला बचत गट, तसेच युवक मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Spread the love
  • Related Posts

    सेवाहक्क दिनानिमित्त फलटण तालुक्यात जनजागृती उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे :तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव  65000 प्रमाणपत्रांचे केले वितरण

    फलटण (आपलं फलटण) सेवाहक्क दिनानिमित्त फलटण तालुक्यात विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले आहे.सेवाहक्क दिनाच्या पार्श्वभूमीवर…

    Spread the love

    मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमुळे विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधींचे दालन खुले :उद्यानविद्या व कृषी महाविद्यालयाचा पुढाकार

    फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा) : फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ एप्रिल रोजी ‘मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह’चे उत्साहात आयोजन…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
    error: Content is protected !!