फलटणच्या वीज प्रश्नावर विधानसभेत सचिन पाटील आक्रमक; महावितरणचा कारभार सुधारा, शेतकरी-ग्राहकांना न्याय द्या

आमदार पाटील म्हणाले की, महाराष्ट्रासह फलटण-कोरेगाव मतदारसंघात महावितरणचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. ग्रामीण भागात कोणतीही पूर्वकल्पना न देता आठ ते दहा तास वीज गायब होत असल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे. घरगुती ग्राहकांनाही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असून, वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे.

याशिवाय चुकीची वीजबिले देऊन ग्राहकांकडून जादा वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकारामुळे हजारो ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली.

फलटण तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून वीज वितरणासाठीच्या डीपी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. चोरी झालेल्या डीपी वेळेत बसविल्या जात नाहीत, तर चोरट्यांचाही माग काढण्यात पोलीस व महावितरण अपयशी ठरत असल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे आमदार पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावर तातडीने संयुक्त मोहीम राबवून डीपी चोरी रोखावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

स्मार्ट मीटरच्या सक्तीवरही आमदार पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला. ग्राहकांना विश्वासात न घेता मीटर बसविले जात असून, रिचार्ज संपताच वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्मार्ट मीटरबाबत व्यापक जनजागृती करण्यात यावी आणि ग्राहकांच्या संमतीनंतरच ते बसविण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

अध्यक्षांच्या माध्यमातून राज्य सरकारला आवाहन करत आमदार सचिन पाटील यांनी फलटण-कोरेगाव मतदारसंघातील महावितरणच्या सर्व समस्या तातडीने सोडवून शेतकरी व सर्वसामान्य वीज ग्राहकांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी विधानसभेत केली.

आपलं फलटण वृत्ताची दाखल :फलटण तालुक्यातील वीज वितरणासाठीच्या डीपी चोरीमुळे महावितरणला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून, शेतकरी अंधारात राहत असल्याचा मुद्दा आपलं फलटण अंकात ठळकपणे प्रसिद्ध केला होता. आमदार सचिन पाटील यांनी विधानसभेत डीपी चोरीचा प्रश्न विशेषत्वाने उपस्थित करत महावितरणच्या निष्काळजी कारभाराचे वाभाडे काढले. डीपी चोरी रोखण्यात अपयशी ठरलेल्या यंत्रणेला जाब विचारत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली. त्यामुळे माध्यमांनी उपस्थित केलेला समस्यांचा प्रश्न थेट विधानसभेत पोहोचल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली.

Spread the love
  • Related Posts

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…

    Spread the love

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!