शेतकऱ्यांच्या बांधावरून सुरू झालेली सेंद्रिय शेतीची क्रांती!दूरदृष्टी, संशोधन आणि शेतकरीहितासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय कार्य

आपलं फलटण प्रतिनिधी :

भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. मात्र गेल्या काही दशकांत रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे जमिनीचे आरोग्य, पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागले. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेतीचा विचार केवळ पर्याय नसून काळाची गरज बनला आहे.
ही गरज ओळखून के. बी. ग्रुप ऑफ कंपनीजचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. सचिन यादव यांनी सेंद्रिय शेतीची व्यापक चळवळ उभारण्याचे ध्येय स्वीकारले. त्यांनी कार्यालयापुरते मर्यादित न राहता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले. आधुनिक संशोधन, प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण केली.
के. बी. ग्रुपने संशोधनाधारित, वनस्पतीजन्य आणि पर्यावरणपूरक सेंद्रिय खतांची व कृषी उत्पादनांची निर्मिती करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे उत्पादनाचा दर्जा सुधारण्याबरोबरच जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास आणि उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होत आहे. सुरक्षित अन्ननिर्मिती आणि निरोगी समाज घडविण्याच्या दिशेने हे कार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे.
“प्रत्येक ताटात सेंद्रिय अन्न” हा केवळ घोषवाक्य नसून श्री. सचिन यादव यांनी स्वीकारलेले सामाजिक ध्येय आहे. रासायनिक शेतीमुळे भविष्यात निर्माण होणारे आरोग्यविषयक धोके ओळखून त्यांनी सेंद्रिय शेतीचा जो दूरदृष्टीपूर्ण मार्ग स्वीकारला, तो आज हजारो शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या उपक्रमाला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असून अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत.
राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त अशा दूरदृष्टी असलेल्या कृषी उद्योजकाच्या कार्याचा गौरव करणे हीच खरी शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता ठरेल. शेती, पर्यावरण आणि मानवाचे आरोग्य यांचा समतोल राखत सेंद्रिय शेतीची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी श्री. सचिन यादव यांचे योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे.
शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. सेंद्रिय शेतीचा प्रसार, सुरक्षित अन्ननिर्मिती आणि शाश्वत कृषी विकासाचा संकल्प अधिक बळकट करण्याची हीच वेळ आहे. राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि सेंद्रिय शेतीच्या या परिवर्तनशील वाटचालीला सलाम!

शब्दांकन हेमंत खलाटे

Spread the love
  • Related Posts

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…

    Spread the love

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!