मल्हारपेठच्या श्री संत तुकाराम विद्यामंदिरचा एसएससी निकाल ९८.३८ टक्के; कावेरी कदम व वरद पाटील संयुक्त प्रथम

मल्हारपेठ (आपलं फलटण प्रतिनिधी) येथील श्री संत तुकाराम विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज यांनी इयत्ता दहावीच्या एसएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत ९८.३८ टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत चमकदार कामगिरी नोंदवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला.
यंदा परीक्षेस १२४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १२२ विद्यार्थी यशस्वी ठरले. विशेष म्हणजे ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या ६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले, तर ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण २८ विद्यार्थ्यांनी संपादन केले. तसेच ४२ विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन तर ३७ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश मिळवून विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण निकालात भर घातली.
विद्यालयात कु. कावेरी मानसिंग कदम व वरद विकास पाटील यांनी प्रत्येकी ९४ टक्के गुण मिळवत संयुक्त प्रथम क्रमांक पटकाविला. कु. संचिताकृष्णा चव्हाण हिने ९३.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. श्रेयश अमोल वाकळे याने ९२ टक्के, कु. आदिती दिलीप यादव हिने ९१.२० टक्के, तर कु. तेजस्विनी उद्धव देसाई हिने ९०.८० टक्के गुण मिळवत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
तसेच श्रद्धा पडवळ, रेवा चव्हाण, अक्षरा जाधव, नील चव्हाण, विघ्नेश चव्हाण, जयंत कोळी, श्रावणी देसाई, श्रावणी मोहिते, श्रेयशी देवकांत, श्रावणी कोळी, कस्तुरी देसाई, ऋतुजा पडवळ, रागिणी माटेकर, सार्थक पवार, अनुज थोरात, सानवी माने, प्रतीक देसाई, संस्कृती मस्के, प्रथमेश देसाई, शिवम चव्हाण, पायल चव्हाण आणि अक्षरा गायकवाड या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय गुण मिळवत विद्यालयाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
या यशाबद्दल प्राचार्य संजय पवार, वर्गशिक्षक एस.एस. मोहिते, ए.जे. पाटील, पी.आर. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच मल्हारपेठ पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Spread the love
  • Related Posts

    विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, पालक आणि समाज यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक” – डॉ. वंदना वाहूळ

    माझेरी पुनर्वसन येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात आपलं फलटण ( वृत्तसेवा ) शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हा परिषद मॉडेल स्कूल,…

    Spread the love

    शिक्षणासाठी रुजवलेले रोपटे आज वटवृक्ष; श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा ६७ वा वर्धापनदिन उत्साहात अच्युतराव खलाटे यांचे गौरवोद्गार; गुणवंतांचा सत्कार, वृक्षारोपण व बीजारोपण उपक्रमाने सोहळ्याची शोभा वाढली

    आपलं फलटण: प्रतिनिधीबहुजन समाजातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त ध्येयातून कर्मयोगी स्व. नामदेवराव सूर्यवंशी बेडके (नाना) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९५९ मध्ये रुजवलेले शिक्षणाचे छोटेसे रोपटे आज भव्य…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश
    error: Content is protected !!