स्वायत्त दर्जामुळे फलटण इंजिनिअरिंग कॉलेजची भरारी; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची अक्षरशःझुंबड! ‘नॅक ए’ ग्रेड, ‘एनबीए’ मानांकन आणि आधुनिक अभ्यासक्रमांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांची पहिली पसंती

फलटण (आपलं फलटण ) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक अभ्यासक्रमांसाठी ‘हाऊसफुल्ल’ची परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकताच प्राप्त झालेला ‘यूजीसी ऑटोनॉमस’ अर्थात स्वायत्त दर्जा, ‘नॅक ए’ ग्रेड आणि ‘एनबीए’ मानांकन यामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले असून, त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मागणी असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यांसारख्या अत्याधुनिक शाखांना विद्यार्थ्यांची विशेष पसंती मिळत आहे. याशिवाय कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या पारंपरिक शाखांनाही मोठी मागणी असल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणेच आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या ध्येयातून महाविद्यालयाने उभारलेली भक्कम शैक्षणिक परंपरा आज अधिक बळकट होताना दिसत आहे.
महाविद्यालयाने केवळ शैक्षणिक गुणवत्तेलाच प्राधान्य दिले नसून विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्ती आणि नावीन्यपूर्ण विचारांना प्रोत्साहन देण्यासाठीही विशेष उपक्रम राबवले आहेत. ‘इन्नोव्हेशन २०२५’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील तब्बल ७०४ संघांनी सहभाग घेत आपल्या संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले होते. या विक्रमी सहभागामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षमतेची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली. तांत्रिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘टेक बीट्स’ सारख्या सांस्कृतिक महोत्सवांतून डान्स, फॅशन शो आणि विविध कलात्मक उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जात आहे.
जागतिक स्तरावरील संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कामही महाविद्यालय प्रभावीपणे करत आहे. आयोजित करण्यात आलेल्या ‘करिअर एक्स्पो’मध्ये तब्बल १७ देशांतील विद्यापीठांचे प्रतिनिधी, विविध बँका तसेच नामांकित कंपन्यांचे अधिकारी सहभागी झाले होते. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य आणि रोजगाराच्या संधींबाबत थेट मार्गदर्शन मिळाले. परिणामी अनेक विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय करिअरची दारे खुली झाली आहेत.
महाविद्यालयाच्या प्रभावी प्लेसमेंट ड्राईव्हमुळे अनेक विद्यार्थ्यांची नामांकित मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये निवड झाली असून, अनेक माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उद्योजक तसेच शासकीय उच्च पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे ‘एफईएस’ इंजिनिअरिंग कॉलेज हे केवळ शिक्षण संस्था न राहता विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा मजबूत पाया बनत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय प्रगतीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन रघुनाथ राजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी संजीवराजे नाईक निंबाळकर , महाविद्यालय समितीचे चेअरमन अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
उच्चविद्याविभूषित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, अद्ययावत शैक्षणिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ घेत परिसरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊन आपले भविष्य घडवावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोज कुमार दळवी यांनी केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण क्षेत्रात वेगाने प्रगती करणारे आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरलेले हे महाविद्यालय आज गुणवत्तेच्या बळावर स्वतंत्र ओळख निर्माण करत असल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Spread the love
  • Related Posts

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटण( आपलं फलटण ) फलटण तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आगामी काही दिवसांत फलटणमध्ये अतिरिक्त MIDC उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत…

    Spread the love

    फलटण इंजिनिअरिंग कॉलेजची अभूतपूर्व झेप; एका आठवड्यात ८३ विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांत नोकरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सिद्ध केली गुणवत्ता; पालकांसह विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

    फलटण (आपलं फलटण) गुणवत्तापूर्ण तंत्रशिक्षण, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि विद्यार्थीकेंद्री प्रशिक्षणाच्या जोरावर ‘फलटण एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची दमदार छाप उमटवली आहे. नॅक ‘ए’ ग्रेड, एनबीए…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
    error: Content is protected !!