फलटण इंजिनिअरिंग कॉलेजची अभूतपूर्व झेप; एका आठवड्यात ८३ विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांत नोकरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सिद्ध केली गुणवत्ता; पालकांसह विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार

फलटण (आपलं फलटण) गुणवत्तापूर्ण तंत्रशिक्षण, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि विद्यार्थीकेंद्री प्रशिक्षणाच्या जोरावर ‘फलटण एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची दमदार छाप उमटवली आहे. नॅक ‘ए’ ग्रेड, एनबीए मानांकन आणि स्वायत्त महाविद्यालयाचा बहुमान प्राप्त असलेल्या या महाविद्यालयातील तब्बल ८३ विद्यार्थ्यांची अवघ्या एका आठवड्यात विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे. त्यामुळे महाविद्यालय परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमिन्स इंडिया लिमिटेडमध्ये ३०, एस.एस.पी.एल. इंडिया लिमिटेडमध्ये २२, इनयंत्रा इंडिया लिमिटेडमध्ये १३, डाना इंडिया लिमिटेडमध्ये १२ तर अदानी सिमेंटमध्ये ६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. एका आठवड्यात एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळाल्याने महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि प्रशिक्षण व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या दैदिप्यमान यशानिमित्त निवड झालेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी आज जागतिक स्तरावरील कंपन्यांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करत असल्याचा अभिमान व्यक्त केला. “ग्रामीण मातीतून घडणारी ही गुणवत्ता राज्यासाठी प्रेरणादायी आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
या गौरव सोहळ्यास गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य शिरीष दोशी, शिरीष भोसले, पराग दोशी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या यशाचे कौतुक केले.
दरम्यान, या भव्य प्लेसमेंट ड्राईव्हचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलमार्फत करण्यात आले होते. प्लेसमेंट ऑफिसर प्रा. शांताराम काळेल, मेकॅनिकल विभागाचे समन्वयक प्रा. आदित्य जाधव तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे समन्वयक प्रा. संग्राम जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ.रामराजे ना. निंबाळकर, नियामक मंडळाचे चेअरमन रघुनाथराजे ना. निंबाळकर, गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन अनिकेतराजे ना. निंबाळकर, सेक्रेटरी संजीवराजे ना. निंबाळकर, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, प्राचार्य डॉ. मनोजकुमार दळवी तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.

Spread the love
  • Related Posts

    विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा, पालक आणि समाज यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक” – डॉ. वंदना वाहूळ

    माझेरी पुनर्वसन येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात आपलं फलटण ( वृत्तसेवा ) शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्हा परिषद मॉडेल स्कूल,…

    Spread the love

    शिक्षणासाठी रुजवलेले रोपटे आज वटवृक्ष; श्रीराम एज्युकेशन सोसायटीचा ६७ वा वर्धापनदिन उत्साहात अच्युतराव खलाटे यांचे गौरवोद्गार; गुणवंतांचा सत्कार, वृक्षारोपण व बीजारोपण उपक्रमाने सोहळ्याची शोभा वाढली

    आपलं फलटण: प्रतिनिधीबहुजन समाजातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त ध्येयातून कर्मयोगी स्व. नामदेवराव सूर्यवंशी बेडके (नाना) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९५९ मध्ये रुजवलेले शिक्षणाचे छोटेसे रोपटे आज भव्य…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!