विडणीकरांचा अभिमान! मयुरजी अभंग यांची PSI पदावर निवड; जिद्द, परिश्रम आणि कुटुंबीयांच्या संस्कारांचे यश

फलटण ( आपलं फलटण) स्पर्धा परीक्षांच्या कठीण प्रवासात सातत्य, चिकाटी आणि ध्येयाप्रती निष्ठा यांचा संगम साधत येथील युवा मयुरजी नंदकुमार अभंग ऊर्फ बबलू भैय्या यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर मिळकावलेले यश फलटण विडणीकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
स्व कृष्णराव अभंग ऊर्फ गांधी आण्णा यांचे नातू असलेल्या मयुरजींनी कुटुंबातील सामाजिक बांधिलकी आणि प्रामाणिकतेचे मूल्य जपत आपल्या कर्तृत्वाची वेगळी छाप पाडली आहे. साध्या पार्श्वभूमीतून येत असतानाही त्यांनी मोठे स्वप्न पाहिले आणि ते साकार करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन त्यांनी आपले ध्येय पूर्ण केले
त्यांच्या या यशामुळे अभंग कुटुंबासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. युवकांसाठी मयुरजींचा प्रवास प्रेरणादायी ठरत असून “परिश्रमाला पर्याय नाही” हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
यशस्वी वाटचालीत कुटुंबीयांचे पाठबळ, मार्गदर्शकांचे मार्गदर्शन आणि स्वतःची अथक मेहनत यांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात पोलीस सेवेत कार्य करताना समाजासाठी निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करण्याचा त्यांचा निर्धार आहे.

Spread the love
  • Related Posts

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    फलटण (पुढारी वृत्तसेवा ) स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धुळदेव (ता. फलटण) परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ४ किलो ६९…

    Spread the love

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    फलटण (आपलं फलटण )‘फलटण एज्युकेशन सोसायटी’ संचलित स्वायत्त आणि ‘NAAC A’ दर्जा तसेच ‘NBA’ मान्यता प्राप्त ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण’च्या वतीने ३ जून रोजी भव्य ‘मिनी मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
    error: Content is protected !!