पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार, दिनांक २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या सर्व विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मंडळाच्या संकेतस्थळांसह विविध अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे:
results.digilocker.gov.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
results.targetpublications.org
results.navneet.com
tv9marathi.com
education.indianexpress.com
निकालानंतर विद्यार्थ्यांना विषयानिहाय गुणांची माहिती ऑनलाईन मिळणार असून त्याची प्रिंटआउट घेण्याची सुविधाही उपलब्ध असेल. तसेच DigiLocker अॅपद्वारे डिजिटल गुणपत्रिका डाउनलोड करण्याची सोय करण्यात आली आहे.
दरम्यान, गुण पडताळणी, छायाप्रत व पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार असून याबाबतच्या अटी व सूचना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांच्या विद्यार्थ्यांचा एकत्रित निकाल ‘कॉलेज लॉगिन’द्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विद्यार्थी व पालकांनी अधिकृत संकेतस्थळांवरच निकाल पाहावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण
आपलं फलटण प्रतिनिधीसातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक, साहित्यप्रेमी व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व कै. प्रा. रमेश तुकाराम आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.००…






