गुणवरेत केमिकल ताडीचा सुळसुळाट; उत्पादन शुल्क विभागाचा ‘डोळेझाक’ कारभार!

फलटण( आपलं फलटण) फलटण तालुक्यातील गुणवरे गावात बेकायदेशीर व केमिकल मिश्रित ताडी विक्रीचा धुमाकूळ सुरू असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रियतेमुळे हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतीने अधिकृत निवेदन देऊनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गावात परप्रांतीय व्यक्तीकडून खुलेआम ताडी विक्री सुरू असून, या ताडीमध्ये केमिकल मिसळले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे गावातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या आहारी जात आहे. काही कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, तर काही तरुण सतत झिंगलेल्या अवस्थेत असतात.
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य शैलेश गावडे-पाटील, युवा नेते पवन जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा अधीक्षक कार्यालय तसेच फलटण येथील उप अधिक्षक कार्यालयात निवेदन देऊन त्वरित कारवाईची मागणी केली होती. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडेही अनेकदा तक्रारी केल्या; मात्र संबंधित ताडी विक्रेत्यांवर केवळ जुजबी कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. स्थानिकांचा विरोध असतानाही ही बेकायदेशीर विक्री लपूनछपून सुरूच असल्याने नागरिकांचा रोष अधिकच वाढला आहे.

“साहेब, कारवाईसाठी मुहूर्त कधी?”
ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया देत प्रशासनाला थेट सवाल केला आहे. “निवेदन देऊनही कारवाई होत नाही, मग नेमका मुहूर्त कधी काढणार?” असा रोखठोक प्रश्न उपस्थित करत, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस निरीक्षकांनी तातडीने लक्ष घालून गुणवरेतील बेकायदेशीर ताडी विक्री कायमची बंद करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

🔲 चौकट : ‘गौड बंगाल’ नेमकं काय?
परराज्यातील इसम गावात येऊन सर्रास ताडीचा व्यवसाय करतो, केमिकलयुक्त ताडीमुळे युवक व्यसनाधीन होत आहेत, त्यांचे करिअर धोक्यात येत आहे—इतके गंभीर चित्र असतानाही प्रशासन मात्र शांत का?
निवेदन, तक्रारी, विरोध… सगळं काही होत असताना कारवाईचा मागमूस नाही, यामागे नेमकं कोणाचं संरक्षण आहे का? कि लक्ष्मी दर्शनाचा प्रभाव असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.
युवकांचे भविष्य अंधारात जात असताना संबंधित यंत्रणा ‘कोमात’ का?हा खरा ‘गौड बंगाल’ ठरत आहे!

Spread the love
  • Related Posts

    साखर उद्योग संकटात; साखरेला योग्य दर मिळणे गरजेचे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

    फलटण( आपलं फलटण वृत्तसेवा ) ऊस उत्पादकांना स्पर्धात्मक दर, कामगारांना योग्य वेतन, बोनस व अन्य सवलती तसेच तोडणी-वाहतूक ठेकेदारांना वेळेवर मोबदला मिळणे यावरच साखर कारखान्यांचे यश अवलंबून आहे. मात्र साखरेला…

    Spread the love

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    फलटण (पुढारी वृत्तसेवा ) स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि फलटण शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत धुळदेव (ता. फलटण) परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ४ किलो ६९…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    साखर उद्योग संकटात; साखरेला योग्य दर मिळणे गरजेचे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

    साखर उद्योग संकटात; साखरेला योग्य दर मिळणे गरजेचे : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

    राष्ट्रसेवा ते समाजसेवा; कर्नल विनोद मारवाह यांना ‘व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्ड’

    राष्ट्रसेवा ते समाजसेवा; कर्नल विनोद मारवाह यांना ‘व्हेटरन अचिव्हर्स अवॉर्ड’

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत
    error: Content is protected !!