फलटण शहर पोलिसांची मोठी कामगिरी; १२ लाख किंमतीचे ४० हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत

फलटण ( आपलं फलटण )सातारा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमार्फत सी.ई.आय.आर. पोर्टलच्या सहाय्याने हरवलेले मोबाईल शोध मोहीम राबविण्यात येत असून, फलटण शहर पोलिसांनी या मोहिमेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध राज्यांसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून तब्बल १२ लाख रुपये किंमतीचे ४० मोबाईल हस्तगत करून ते मूळ मालकांना परत देण्यात आले.
सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कदम यांच्या सूचनेनुसार ही विशेष मोहीम राबविण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सी.ई.आय.आर. पोर्टलच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करत ही कारवाई केली.
या मोहिमेदरम्यान कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात, तेलंगणा या राज्यांसह महाराष्ट्रातील कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, धुळे आणि पुणे जिल्ह्यांतून मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले.
फलटण शहर पोलिस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, तहसीलदार अभिजित जाधव आणि पोलिस निरीक्षक श्री. अरविंद काळे यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना मोबाईल परत देण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिस प्रशासनाचे कौतुक केले.
सन २०२४ पासून आजअखेर फलटण शहर पोलिस ठाण्याकडून तब्बल ५५५ हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. विशाल खांबे आणि पोलिस निरीक्षक श्री. अरविंद काळे यांनी नागरिकांना मोबाईल चोरी अथवा हरवल्यास तात्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
या कारवाईत महिला पोलिस उपनिरीक्षक अयोध्या घोरपडे तसेच सी.ई.आय.आर. पोर्टलचे कामकाज पाहणारे पोलिस अंमलदार स्वप्नील खराडे, राणी फाळके, महेश जगदाळे, जितेंद्र टिके, मुकेश घोरपडे आणि अतुल बडे यांनी सहभाग घेतला.

Spread the love
  • Related Posts

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    आपलं फलटण प्रतिनिधीसातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक, साहित्यप्रेमी व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व कै. प्रा. रमेश तुकाराम आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.००…

    Spread the love

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    आपलं फलटण प्रतिनिधी भारतीय शेती एका नव्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभी आहे. वाढते उत्पादन, बदलते हवामान, रासायनिक अवशेषांबाबत वाढती जागरूकता आणि निर्यातीसाठी अधिक कठोर होत जाणारे कमाल अवशेष मर्यादा (एम.आर.एल.) निकष…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी

    फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

    पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती

    पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज     भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : फलटण शहरात विशेष वाहतूक आराखडा जाहीर१७ व १८ जुलै रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : फलटण शहरात विशेष वाहतूक आराखडा जाहीर१७ व १८ जुलै रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन
    error: Content is protected !!