उन्हाळी क्रीडा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; दर्जेदार खेळाडू घडविण्याचा संजीवराजेंचा विश्वास

फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा) :
फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समिती व फलटण जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास तालुक्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या शिबिरातून भविष्यात दर्जेदार खेळाडू घडतील, असा विश्वास फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
दि. २३ ते ३० एप्रिल दरम्यान विविध क्रीडांगणांवर हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मा. आमदार श्रीमंत शिवाजीराजे क्रीडा संकुल येथे खो-खो, हॉकी, कबड्डी, तर श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई), जाधववाडी येथे फुटबॉल, आर्चरी, कराटे आणि मुधोजी महाविद्यालयात ॲथलेटिक्सचे प्रशिक्षण दिले जात आहे. या शिबिरात सुमारे ४५० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले आहेत.
शिबिराचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी फलटणला खो-खो, हॉकी व फुटबॉल या खेळांची समृद्ध परंपरा असल्याचे सांगितले. सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर खेळाडूंनी या परंपरेला नवे उंचीवर नेण्याचे आवाहन त्यांनी केले. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये अधिकाधिक खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी महादेवराव माने, संजय फडतरे, प्रा. पी. एच. कदम, प्राचार्य वसंतराव शेडगे, डॉ. सागर निंबाळकर, आर. बी. निंबाळकर, महेश निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात खेळाडूंना योगाभ्यास, व्यायाम, संतुलित आहाराचे महत्त्व तसेच मानसिक ताण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. हॉकी, फुटबॉल, खो-खो, ॲथलेटिक्स, धनुर्विद्या, कबड्डी व कराटे या खेळांचे प्रशिक्षण अनुभवी एनआयएस प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दिले जात आहे.
सदर शिबिरात खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेसह तांत्रिक कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात येत असून सहभागी खेळाडूंना दररोज सरावानंतर अल्पोपहार देण्यात येणार आहे. शिबिर पूर्ण करणाऱ्या सर्वांना सहभाग प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तायप्पा शेंडगे यांनी केले. प्रस्ताविक सचिन धुमाळ यांनी तर आभार प्रदर्शन तुषार मोहिते यांनी मानले.
📌 मार्गदर्शक प्रशिक्षकांची फळी
हॉकी : सचिन धुमाळ, खुरंगे बी.बी., कु. धनश्री
फुटबॉल : संजय फडतरे, अमित काळे, अमोल नाळे, उत्तमराव घोरपडे, संकेत मठपती
खो-खो : शिवाजी बनकर, अविनाश गंगतीरे, गावडे मॅडम, मुलाणी मॅडम
आर्चरी व कराटे : सुरज ढेंबरे
कबड्डी : तुषार मोहिते
ॲथलेटिक्स : राज जाधव, प्रा. तायप्पा शेंडगे
(सर्व प्रशिक्षक अनुभवी असून एनआयएसच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जात आहे.)

Spread the love
  • Related Posts

    लखन मोरे यांचे नेतृत्व युवा पिढीसाठी प्रेरणादायी: सचिन यादव देशाभिमान वाढविणारी ऐतिहासिक कामगिरी” — सचिन यादव

    फलटण(आपलं फलटण प्रतिनिधी)खेळ हा केवळ विजय-पराजयाचा विषय नसून शिस्त, समर्पण, नेतृत्व आणि देशभक्तीची भावना विकसित करणारे प्रभावी माध्यम आहे. भारतीय सॉफ्ट हॉकी संघाचे कर्णधार लखन नंदकुमार मोरे यांनी आपल्या नेतृत्वगुणांच्या…

    Spread the love

    लखन मोरे यांच्या नेतृत्वाखाली भारताचा साऊथ एशियन सॉफ्ट हॉकीवर दणदणीत कब्जाअंतिम सामन्यात पाकिस्तानचा ११-१ ने धुव्वा; फलटणच्या नावाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव

    फलटण (पुढारी वृत्तसेवा) नेपाळची राजधानी काठमांडू येथे पार पडलेल्या पहिल्याच साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने दैदिप्यमान कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. भारतीय संघाचे नेतृत्व फलटणचा सुपुत्र लखन…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश
    error: Content is protected !!