लखन मोरे यांचे नेतृत्व युवा पिढीसाठी प्रेरणादायी: सचिन यादव देशाभिमान वाढविणारी ऐतिहासिक कामगिरी” — सचिन यादव

फलटण(आपलं फलटण प्रतिनिधी)
खेळ हा केवळ विजय-पराजयाचा विषय नसून शिस्त, समर्पण, नेतृत्व आणि देशभक्तीची भावना विकसित करणारे प्रभावी माध्यम आहे. भारतीय सॉफ्ट हॉकी संघाचे कर्णधार लखन नंदकुमार मोरे यांनी आपल्या नेतृत्वगुणांच्या बळावर देशाला अभिमानास्पद यश मिळवून दिले असून त्यांचा प्रवास युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. खेळातील कौशल्य गुणाच्या आधारे त्याने फलटणच्या नावलौकिकातही भर घातला आहे फलटणकरांसाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार के. बी. उद्योग समूहाचे संचालक व युवा उद्योजक सचिन यादव यांनी काढले.
नेपाळची राजधानी काठमांडू येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय पुरुष सॉफ्ट हॉकी संघाने पाकिस्तानचा अंतिम सामन्यात ७-० असा दणदणीत पराभव करून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व फलटणचे सुपुत्र लखन नंदकुमार मोरे यांनी यशस्वीपणे केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल के. बी. उद्योग समूहाच्या वतीने लखनचा आई-वडिलांच्या समवेत सचिन यादव व सौ. सुजाता सचिन यादव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक यशामुळे देशासह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून लखन मोरे यांच्या नेतृत्वाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
के. बी. उद्योग समूह सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, कला, संस्कृती, सामाजिक कार्य आणि क्रीडा क्षेत्रातील गुणवंतांना सातत्याने प्रोत्साहन देत आहे. विविध खेळांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आर्थिक व नैतिक पाठबळ देऊन त्यांचा उत्साह वाढविण्याचे कार्यही समूहामार्फत केले जाते.
दरम्यान, पूर्णपणे भारतात विकसित झालेल्या सॉफ्ट हॉकी या खेळाची लोकप्रियता दक्षिण आशियाई देशांमध्ये झपाट्याने वाढत आहे. पहिल्याच साऊथ एशियन चॅम्पियनशिपमध्ये भारताने विजेतेपद पटकावून या खेळातील आपले वर्चस्व अधोरेखित केले आहे.

कृतज्ञता
भारतीय सॉफ्ट हॉकी संघाचे कर्णधार लखन नंदकुमार मोरे यांनी आपल्या सत्काराबद्दल के. बी. उद्योग समूह आणि युवा उद्योजक सचिन यादव यांचे आभार मानले. “राष्ट्रीय स्तरावरील यशानंतर आपल्या मातीतील आणि आपल्या माणसांकडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि अविस्मरणीय आहे. हा घरचा सत्कार मला भविष्यात आणखी जोमाने देशासाठी खेळण्याची प्रेरणा देणारा ठरेल,” अशा भावना मोरे यांनी व्यक्त केल्या
.

Spread the love
  • Related Posts

    व्यसनमुक्ती, राष्ट्रभक्ती आणि इतिहासाचा जागर : सिंदखेडराजा ते पाचाड दि. २५ जूनपासून पदयात्रा

    आपलं फलटण( प्रतिनिधी) युवकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश रुजविणे, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याचा गौरव करणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमागील प्रेरणास्रोत असलेल्या मातृशक्तीचे स्मरण जपणे या उदात्त हेतूने व्यसनमुक्त युवक संघ,…

    Spread the love

    ३६ वर्षांचा सामाजिक परिवर्तनाचा दीपस्तंभ!डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचा प्रेरणादायी प्रवास; प्रबुद्ध विद्याभवनालाही ३२ वर्षे पूर्ण

    फलटण(आपलं फलटण प्रतिनिधी) सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा सातत्यपूर्ण प्रसार या ध्येयाने कार्यरत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, मंगळवार पेठ, फलटण या संस्थेने…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    कथालेखनाला मिळणार योगेश सोमण, प्रमोद पवार यांचे मार्गदर्शन व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार व शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साताऱ्यात कार्यशाळा; नवोदित लेखकांसाठी सुवर्णसंधी

    error: Content is protected !!