फलटणचा सुपुत्र आता देशाचा कर्णधार! साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी स्पर्धेसाठी लखन मोरेची भारतीय संघात निवड


​फलटण (विशेष प्रतिनिधी):
जिद्द, चिकाटी आणि अखंड परिश्रमाच्या जोरावर एखादा खेळाडू मातीच्या मैदानावरून थेट आंतरराष्ट्रीय शिखरावर कसा पोहोचू शकतो, याचं जिवंत आणि जाज्वल्य उदाहरण म्हणजे फलटणचा सुपुत्र लखन नंदकुमार मोरे! नेपाळमधील काठमांडू येथे दि. २०, २१ आणि २२ मे २०२६ रोजी रंगणाऱ्या पहिल्या ऐतिहासिक ‘साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी चॅम्पियनशिप’साठी भारतीय पुरुष सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी लखनची निवड झाली आहे. (लखन हा फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचा सुपुत्र आहे )या निवडीमुळे केवळ फलटणच्याच नव्हे, तर संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, क्रीडा जगतातून आनंदाचा महापूर ओसंडून वाहत आहे.
‘​जयपूरच्या शिबिरात लखनच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब’
​राजस्थानमधील जयपूर येथे दि. १४ ते १८ मे दरम्यान भारतीय संघाचे पाच दिवसांचे विशेष राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर पार पडले. संपूर्ण देशभरातून आलेल्या शेकडो दर्जेदार खेळाडूंच्या कडक चाचणीतून उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर ऑल इंडिया सॉफ्ट हॉकी फेडरेशनच्या निवड समितीने लखन मोरेच्या नेतृत्वगुणांवर विश्वास दाखवला. त्याची भारतीय संघाचा सेनापती (कर्णधार) म्हणून घोषणा होताच फलटणमध्ये ‘चक दे इंडिया’चा एकच जल्लोष सुरू झाला.
‘​मैदानांची पुण्याई आणि गुरूंचे संस्कार’
​लखनचा हा प्रवास सोपा नव्हता. फलटणच्या ऐतिहासिक नगरीतील मातीशी त्याची नाळ जोडलेली आहे. त्याचे माध्यमिक शिक्षण श्री. यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे, तर उच्च शिक्षण मुधोजी कॉलेज, फलटण येथे झाले.
​यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे मैदान, घडसोली मैदान आणि मुधोजी कॉलेजच्या मैदानांवर घाम गाळत, क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली लखनने हॉकीचे प्राथमिक धडे गिरवले. आज याच मैदानांची पुण्याई आणि शिक्षकांचे संस्कार लखनला आंतरराष्ट्रीय पटलावर घेऊन गेले आहेत, अशी भावना फलटणकरांमधून व्यक्त होत आहे. विशेषतः मंगळवार पेठ आणि कसबा पेठ भागात लखनच्या या यशाने चोहीकडे आनंदी आनंद पसरला आहे
‘​दक्षिण आशियाई स्तरावर प्रतिष्ठेची लढाई’
​काठमांडू येथील या पहिल्या-वहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासह नेपाळ, पाकिस्तान आणि भूतान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी देश आमनेसामने ठाकणार आहेत. दक्षिण आशियाई स्तरावरील ही अत्यंत प्रतिष्ठेची लढाई मानली जात असून, अशा मोठ्या रणसंग्रामात भारतीय संघाचे सारथ्य फलटणचा तरुण करणार, ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
‘​नेतेमंडळी व क्रीडाप्रेमींकडून शुभेच्छांचा वर्षाव!
​लखन मोरेच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान कार्यालयाकडून फोन द्वारे, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे ना. निंबाळकर, शिवसेना नेते श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर, नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे ना. निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजीतराजे ना. निंबाळकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक आणि सिनिअर खेळाडूंनी त्याचे प्रत्यक्ष व सोशल मीडियाद्वारे अभिनंदन केले आहे.
​’आपलं फलटण’ समूहाकडून भारतीय संघाचा कर्णधार लखन मोरे आणि संपूर्ण भारतीय संघाला या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी करण्यासाठी ‘विजयी भव’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Spread the love
  • Related Posts

    लखन मोरे यांच्या नेतृत्वाखाली भारताचा साऊथ एशियन सॉफ्ट हॉकीवर दणदणीत कब्जाअंतिम सामन्यात पाकिस्तानचा ११-१ ने धुव्वा; फलटणच्या नावाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव

    फलटण (पुढारी वृत्तसेवा) नेपाळची राजधानी काठमांडू येथे पार पडलेल्या पहिल्याच साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने दैदिप्यमान कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. भारतीय संघाचे नेतृत्व फलटणचा सुपुत्र लखन…

    Spread the love

    कुस्ती क्षेत्रासाठी सुवर्णदिन; हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांना फलटणचा मानाचा मुजरा नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडून भव्य सत्कार; “कुस्ती क्षेत्रासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार

    फलटण (आपलं फलटण) सातारा जिल्ह्याच्या कुस्ती परंपरेला नवा सुवर्णस्पर्श देणाऱ्या हिंदकेसरी पैलवान महेंद्र गायकवाड यांचा फलटण नगरपालिकेत नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण आणि दिमाखदार सत्कार करण्यात आला. सातारा येथे…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
    error: Content is protected !!