लखन मोरेच्या नेतृत्वाखाली भारतीय सॉफ्ट हॉकी संघाची दमदार घोडदौडनेपाळ व भूतानवर एकतर्फी विजय; आता पाकिस्तानविरुद्ध महासंग्राम

लखन मोरेच्या नेतृत्वाखाली भारतीय सॉफ्ट हॉकी संघाची दमदार घोडदौड
नेपाळ व भूतानवर एकतर्फी विजय; आता पाकिस्तानविरुद्ध महासंग्राम
फलटण : नेपाळमधील काठमांडू येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय सॉफ्ट हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने शानदार कामगिरी करत नेपाळ व भूतान या दोन्ही संघांचा धुव्वा उडवला आहे. भारतीय संघाने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर नेपाळचा ६-० तर भूतानचा ५-० अशा फरकाने पराभव करत स्पर्धेतील निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
भारतीय संघाच्या या दमदार यशामध्ये फलटणचा सुपुत्र लखन मोरे यांचे नेतृत्व विशेष ठरत आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाचे कर्णधार म्हणून लखन मोरे अत्यंत प्रभावी कामगिरी बजावत असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने सलग विजय मिळवत स्पर्धेत दणदणीत आगेकूच केली आहे. फलटणच्या भूमीतून घडलेला खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नेतृत्व करत असल्याने फलटणकरांमध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय संघाचा पुढील आणि अत्यंत महत्त्वाचा सामना उद्या सकाळी ११ वाजता पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध रंगणार आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचे विशेष लक्ष लागले असून भारताने विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
फलटणकरांच्या वतीने भारतीय संघाला तसेच कर्णधार लखन मोरे यांना पुढील सामन्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानवर विजय मिळवत भारतीय संघाने आणखी एक सुवर्णक्षण देशाच्या नावावर करावा, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Spread the love
  • Related Posts

    लखन मोरे यांचे नेतृत्व युवा पिढीसाठी प्रेरणादायी: सचिन यादव देशाभिमान वाढविणारी ऐतिहासिक कामगिरी” — सचिन यादव

    फलटण(आपलं फलटण प्रतिनिधी)खेळ हा केवळ विजय-पराजयाचा विषय नसून शिस्त, समर्पण, नेतृत्व आणि देशभक्तीची भावना विकसित करणारे प्रभावी माध्यम आहे. भारतीय सॉफ्ट हॉकी संघाचे कर्णधार लखन नंदकुमार मोरे यांनी आपल्या नेतृत्वगुणांच्या…

    Spread the love

    लखन मोरे यांच्या नेतृत्वाखाली भारताचा साऊथ एशियन सॉफ्ट हॉकीवर दणदणीत कब्जाअंतिम सामन्यात पाकिस्तानचा ११-१ ने धुव्वा; फलटणच्या नावाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव

    फलटण (पुढारी वृत्तसेवा) नेपाळची राजधानी काठमांडू येथे पार पडलेल्या पहिल्याच साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने दैदिप्यमान कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. भारतीय संघाचे नेतृत्व फलटणचा सुपुत्र लखन…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी

    फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

    पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती

    पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज     भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : फलटण शहरात विशेष वाहतूक आराखडा जाहीर१७ व १८ जुलै रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : फलटण शहरात विशेष वाहतूक आराखडा जाहीर१७ व १८ जुलै रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन
    error: Content is protected !!