कुस्ती क्षेत्रासाठी सुवर्णदिन; हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांना फलटणचा मानाचा मुजरा नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडून भव्य सत्कार; “कुस्ती क्षेत्रासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार

फलटण (आपलं फलटण) सातारा जिल्ह्याच्या कुस्ती परंपरेला नवा सुवर्णस्पर्श देणाऱ्या हिंदकेसरी पैलवान महेंद्र गायकवाड यांचा फलटण नगरपालिकेत नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण आणि दिमाखदार सत्कार करण्यात आला. सातारा येथे नुकत्याच पार पडलेल्या हिंदकेसरी स्पर्धेत मानाचा हिंदकेसरी किताब पटकावल्यानंतर सातारा जिल्ह्यात प्रथमच फलटणमध्ये झालेल्या या सत्कार सोहळ्यामुळे कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. “फलटणची कुस्ती परंपरा राज्यात आदर्शवत असून या क्षेत्रातील खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,” अशी ग्वाही नगराध्यक्षांनी देत हिंदकेसरी गायकवाड यांच्या यशाचे भरभरून कौतुक केले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष समशेरसिंह ना.निंबाळकर यांनी सांगितले की, फलटण तालुका हा परंपरेने मर्दानी खेळांचा वारसा जपणारा तालुका आहे. संस्थान काळापासून येथे कुस्ती परंपरा जोपासली जातेय. हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचे यश संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचा विश्वास दिला
सत्काराला उत्तर देताना हिंदकेसरी महेंद्र गायकवाड भावुक झाले. “सातारा जिल्ह्याने मला नेहमीच प्रेम, पाठिंबा आणि प्रेरणा दिली. माझी पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धाही साताऱ्यातूनच झाली होती. त्या वेळीही नागरिकांनी मला मोठा आधार दिला. हिंदकेसरी किताब पटकावल्यानंतर फलटणमध्ये माझा पहिला सत्कार होतोय याचा मला मनस्वी आनंद होत आहे. आता यापुढे अधिक मेहनत घेऊन भारताला ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून देण्याचे माझे स्वप्न आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान कुस्ती क्षेत्राकडे महाराष्ट्र शासनाने अधिक लक्ष देऊन गावोगावी पूर्वीप्रमाणे नव्या तालमी उभारण्यासाठी शासनाने सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांनी फलटणच्या कुस्ती परंपरेचे कौतुक करत या सत्काराबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच वाखरी (ता. फलटण) येथील नामवंत पैलवान जयदीप गायकवाड यांनी हिंदकेसरी लढतीदरम्यान चर्चेत आलेल्या ‘हाताची सांड काढणे’ या डावाबाबत स्पष्टीकरण देताना बचावात्मक खेळ करताना विशिष्ट हाताचा पवित्रा घ्यावा लागतो, त्यामुळे गैरसमज निर्माण झाला होता, असे सांगितले.
भाजपाचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनीही फलटण तालुक्याच्या वतीने हिंदकेसरी गायकवाड यांचे अभिनंदन करत, फलटणमध्ये सत्कार स्वीकारल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
फलटणच्या मातीतील कुस्ती संस्कृतीला नवचैतन्य देणारा हा सत्कार सोहळा उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात पार पडला. यावेळी नगरसेवक अशोकराव जाधव,रोहित नागटिळे, राहुल निंबाळकर ,अमित भोईटे, सचिन अहिवळे, अमोल सस्ते, अनुप शहा कुस्ती क्षेत्रातील नामवंत पैलवान, नगरपालिकेचे कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love
  • Related Posts

    लखन मोरे यांचे नेतृत्व युवा पिढीसाठी प्रेरणादायी: सचिन यादव देशाभिमान वाढविणारी ऐतिहासिक कामगिरी” — सचिन यादव

    फलटण(आपलं फलटण प्रतिनिधी)खेळ हा केवळ विजय-पराजयाचा विषय नसून शिस्त, समर्पण, नेतृत्व आणि देशभक्तीची भावना विकसित करणारे प्रभावी माध्यम आहे. भारतीय सॉफ्ट हॉकी संघाचे कर्णधार लखन नंदकुमार मोरे यांनी आपल्या नेतृत्वगुणांच्या…

    Spread the love

    लखन मोरे यांच्या नेतृत्वाखाली भारताचा साऊथ एशियन सॉफ्ट हॉकीवर दणदणीत कब्जाअंतिम सामन्यात पाकिस्तानचा ११-१ ने धुव्वा; फलटणच्या नावाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव

    फलटण (पुढारी वृत्तसेवा) नेपाळची राजधानी काठमांडू येथे पार पडलेल्या पहिल्याच साऊथ एशियन सॉफ्ट हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने दैदिप्यमान कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. भारतीय संघाचे नेतृत्व फलटणचा सुपुत्र लखन…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश
    error: Content is protected !!