फलटणमध्ये ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी यांची पत्रकारांशी ‘ग्रेट भेट’; मार्गदर्शनातून पत्रकारितेचे मूल्य अधोरेखित

फलटण ( आपलं फलटण)पत्रकारितेचा पाया सत्य, धैर्य आणि समाजाभिमुखता यावर उभा असतो, याची जाणीव पुन्हा एकदा करून देणारी एक प्रेरणादायी भेट फलटण येथे पार पडली. ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी यांची स्थानिक पत्रकारांसोबत ‘ग्रेट भेट’ झाली आणि या भेटीत अनुभव, विचार आणि पत्रकारितेच्या मूल्यांवर हितगुज रंगले.
पत्रकारितेचे जनक मानले जाणारे बालशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा वारसा जपत, “रोखठोक आणि निर्भीड पत्रकारिता” कशी असावी यावर प्रसन्न जोशी यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील पत्रकारांनी केवळ बातमी देणारे न राहता समाजाचे सजग प्रहरी बनावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या भेटीत त्यांनी पत्रकारितेतील प्रामाणिकपणा, सत्यशोधनाची वृत्ती आणि लोकहिताचा दृष्टिकोन यांचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या काळात डिजिटल माध्यमांचा प्रभाव वाढत असताना, पत्रकारांनी आपल्या मूल्यांशी तडजोड करू नये, असा मौलिक संदेशही त्यांनी दिला.
या प्रसंगी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांची विशेष उपस्थिती होती. तसेच विविध माध्यमांतील मान्यवर पत्रकारांनीही या भेटीत सहभाग घेतला. यामध्ये दैनिक पुढारीचे पोपटराव मिंड, आस्था टाईम्सचे संपादक दादासाहेब चोरमले, दैनिक प्रभातचे तथा माजी नगरसेवक अजय माळवे, दैनिक पुण्यनगरीचे फलटण तालुका प्रतिनिधी तसेच देवत्व बेकर्सचे संचालक यशवंत खलाटे पाटील, धैर्य टाईम्सचे संपादक सचिन मोरे, सातारा न्यूजचे प्रतिनिधी राजेंद्र बोंद्रे आणि श्रीहरी सुभाषितचे कार्यकारी संपादक युवा पत्रकार यश सुभाष भांबुरे उपस्थित होते.
ही ‘ग्रेट भेट’ पत्रकारांसाठी केवळ संवादाचा नव्हे, तर प्रेरणा आणि मार्गदर्शनाचा अनमोल ठेवा ठरली. पत्रकारितेच्या मूल्यांना उजाळा देत, समाजाभिमुख पत्रकारितेचा संकल्प अधिक दृढ करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Spread the love
  • Related Posts

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी: शिक्षण क्षेत्रात गेली दोन दशके उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या वडले, फलटण येथील सौ. संजीवनी संपत सोनवलकर यांना ग्लोबल इलाइट मीडिया टेक, पुणे…

    Spread the love

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण-पंढरपूर महामार्गावरील राजुरी चौफुला कुरवली पाटी ता. फलटण येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला आय-ट्वेंटी कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मंगल विठ्ठल साठे (वय 42…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    विद्यार्थी घडविण्याच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल प्राचार्य संजीवनी सोनवलकर यांना ‘नॅशनल टीचर अवॉर्ड २०२६’; २० वर्षांच्या शैक्षणिक योगदानाचा गौरव

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    आय-ट्वेंटीच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू राजुरी चौफुला कुरवली पाटी येथे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी; संतप्त ग्रामस्थांचा महामार्गावर रास्ता रोको

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा
    error: Content is protected !!