अविश्वासाच्या राजकारणाला कंटाळून’ शिवरुपराजे खर्डेकर यांचा तालुकाध्यक्षपदाचा राजीनामापंचायत समिती सभापती निवडीतील घडामोडींनंतर राष्ट्रवादीत खळबळ

फलटण (आपलं फलटण) : फलटण तालुक्यातील पंचायत समिती सभापती निवडीदरम्यान घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली असून फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरुपराजे खर्डेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील काही सदस्यांनी दाखविलेल्या अविश्वासामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.पंचायत समिती सभापती निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य अचानक भारतीय जनता पक्षात दाखल झाले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेली सदस्या सभापतीपदी विराजमान झाली; मात्र निवड प्रक्रियेपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वात नाराजीची भावना निर्माण झाली.या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका संघटनेत अस्वस्थता निर्माण झाली असून त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत तालुकाध्यक्ष शिवरुपराजे खर्डेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. खर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने फलटण तालुक्यात संघटनात्मक बळ वाढवले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात आमदारकीची सत्ता टिकविण्यात तसेच फलटण नगरपालिकेत सत्तांतर घडवून आणण्यात पक्षाला यश मिळाले होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत.दरम्यान, पंचायत समिती सभापती निवडीच्या वेळी घडलेल्या या राजकीय उलथापालथीमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. या पार्श्वभूमीवर खर्डेकर यांच्या राजीनाम्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक कामकाजावर आणि आगामी राजकीय घडामोडींवर काय परिणाम होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Spread the love
  • Related Posts

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटण( आपलं फलटण ) फलटण तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आगामी काही दिवसांत फलटणमध्ये अतिरिक्त MIDC उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत…

    Spread the love

    सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा बिगुल१८ जूनला मतदान; २२ जूनला मतमोजणी, आचारसंहिता तात्काळ लागू

    फलटण : वृत्तसेवा: सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून मतदारसंघात तात्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. संबंधित सदस्यांचा कार्यकाळ…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
    error: Content is protected !!