ओबीसी आरक्षणावर अन्यायाचा आरोप; सागर अभंग यांचा भाजप ओबीसी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा “मी पक्षाचा नाही, ओबीसी समाजाचा” – सभापती निवडीविरोधात तीव्र निषेध

फलटण ( आपलं फलटण) : फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीनंतर ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचा आरोप करत भाजप ओबीसी आघाडीचे फलटण तालुका अध्यक्ष सागर कांतिलाल अभंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सभापती पद ओबीसी समाजासाठी आरक्षित असतानाही त्या समाजाच्या भावनांचा अवमान झाल्याचा आरोप करत त्यांनी या निवड प्रक्रियेचा जाहीर निषेध नोंदविला.
या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सागर अभंग यांनी म्हटले आहे की, पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला आरक्षण असताना त्या समाजाच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखी घटना घडली. ही बाब अत्यंत निंदनीय असून ओबीसी समाजावर झालेला हा अन्याय मन सुन्न करणारा आहे.
या घटनेचा निषेध व्यक्त करत आपण फलटण तालुका भाजप ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा त्यांनी केली. “मी पक्षाचा नाही, माझ्या ओबीसी समाजाचा आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
अभंग यांनी पुढे स्पष्ट केले की, या निर्णयामागे कोणत्याही नेत्यांविषयी किंवा पक्ष नेतृत्वाविषयी वैयक्तिक राग नाही. मात्र ओबीसी समाजाला सभापती पदाचे आरक्षण असतानाही त्या समाजावर अन्याय का झाला, याचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे या संपूर्ण निवड प्रक्रियेचा निषेध म्हणून राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
सागर कांतिलाल अभंग हे विडणी येथील लोकनियुक्त सरपंच असून भाजप ओबीसी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारीही ते सांभाळत होते. त्यांच्या या निर्णयामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
“ओबीसी समाजाच्या पाठीशी उभा”
“सभापती पद ओबीसी समाजासाठी आरक्षित असताना त्या समाजावर अन्याय झाला आहे. ही बाब मी सहन करू शकत नाही. त्यामुळे या निवडीचा निषेध करत मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. माझा कोणत्याही नेत्यांवर राग नाही; परंतु माझ्या समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात मी ठामपणे उभा आहे.”

— सागर कांतिलाल अभंग,
अध्यक्ष, भाजप ओबीसी आघाडी, फलटण तालुका

Spread the love
  • Related Posts

    विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक पर्वाची मेजवानी!लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा गोंधळ; भव्य दांडिया स्पर्धा अन् आकर्षक बक्षिसांची पर्वणी

    आपलं फलटण : (विडणी प्रतिनिधी) शारदीय नवरात्रोत्सव २०२६ निमित्त विडणी येथे माता-भगिनींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेले लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा…

    Spread the love

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

     आपलं फलटण प्रतिनिधी “स्थानिक विरोधकांच्या सांगण्यावरून श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा षडयंत्राला बळी पडू नये. सभासदांच्या बळावर आणि लोकांच्या विश्वासाच्या जोरावर श्रीराम सहकारी साखर…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!