महाराजा मल्टीस्टेटची सलग चौथी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोधसभासदांचा चेअरमन दिलीपसिंह भोसले यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास

फलटण (आपलं फलटण वृत्तसेवा) महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक यंदाही बिनविरोध पार पडली असून विद्यमान चेअरमन दिलीपसिंह भोसले यांच्या नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे संस्थेची सलग चौथी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडण्याची उल्लेखनीय नोंद झाली असून संस्थेच्या कारभाराबद्दल सभासदांमध्ये असलेला विश्वास अधोरेखित झाला आहे.
ही निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी कांबळे, नायब तहसीलदार अनिल जाधव तसेच सहाय्यक निबंधक राहुल देशमुख आदी अधिकारी उपस्थित होते. सभासदांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाची अधिकृत घोषणा केली.
महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांत विस्तारलेली महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी सध्या सुमारे ५ हजार सभासदांचे बळ घेऊन कार्यरत आहे. संस्थेची सुमारे ८०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असून आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार आणि काटकसरीचे धोरण यामुळे संस्थेने सहकार क्षेत्रात आपली भक्कम ओळख निर्माण केली आहे.
चेअरमन दिलीपसिंह भोसले आणि व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने गेल्या काही वर्षांत सातत्याने प्रगतीची वाटचाल केली आहे. सभासद व ठेवीदारांच्या हिताला प्राधान्य देत आर्थिक व्यवहारात पारदर्शकता राखणे, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि सहकार क्षेत्रातील विश्वासार्हता टिकवून ठेवणे या धोरणांमुळे संस्थेची विश्वासार्हता अधिक दृढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सभासदांनी पुन्हा एकदा विद्यमान नेतृत्वावर विश्वास टाकत संचालक मंडळ बिनविरोध निवडून दिले.
सन २०२६-२७ ते २०३१-३२ या कालावधीसाठी निवडून आलेले संचालक मंडळ पुढीलप्रमाणे :
दिलीपसिंह भोसले, रणजितसिंह भोसले, अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले, सौ. प्रियदर्शनी भोसले, तुषार गांधी, हेमंत फुले, अमोल सस्ते, कुमार भट्टड, विलास रसाळ, दिपराज तावरे व सुभाष आढाव.
नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाकडून आगामी काळात संस्थेचा विस्तार, सभासदांना अधिक चांगल्या सेवा आणि सहकार क्षेत्रात नवे उपक्रम राबविण्याबाबत अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Spread the love
  • Related Posts

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगर बीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त

    प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगरबीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त आपलं फलटण( प्रतिनिधी )फलटण पंचायत समितीचा…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    कथालेखनाला मिळणार योगेश सोमण, प्रमोद पवार यांचे मार्गदर्शन व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार व शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साताऱ्यात कार्यशाळा; नवोदित लेखकांसाठी सुवर्णसंधी

    error: Content is protected !!