फलटण–कोरेगाव मतदारसंघासाठी ९३ कोटींच्या रस्ते विकासकामांना हिरवा कंदील७० हून अधिक रस्त्यांची सुधारणा; ग्रामीण भागातील दळणवळणाला नवी गती.

फलटण (आपलं फलटण ) राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात फलटण–कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासासाठी तब्बल ९३ कोटी ३५ लाख रुपयांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून मतदारसंघातील ७० पेक्षा अधिक प्रमुख जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते आणि गावांतर्गत रस्त्यांची सुधारणा, डांबरीकरण व काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामांमुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असून शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी राज्य शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे. मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ते सुधारणा कामांना आता गती मिळणार आहे. त्यामुळे गावागावांतील संपर्क सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.
मंजूर झालेल्या कामांमध्ये फलटण व कोरेगाव तालुक्यातील विविध प्रमुख मार्गांचा समावेश आहे. या कामांमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, गटार व संरक्षक भिंती बांधकाम यांचा समावेश आहे. काही ठिकाणी पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होणाऱ्या रस्त्यांवर विशेष सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निधीतून कुरवली, गिरवी, जिंती, सांगवी, नांदल, सुरवडी, पिंपळवाडी, तावडी, सासवड, गुणवरे, राजाळे, ढवळ, तरडगाव, जाधववाडी, निंबळक, कापडगाव आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची सुधारणा करण्यात येणार आहे. याशिवाय वस्ती ते मुख्य रस्ता जोडणारे अनेक लघुरस्ते व शिवार रस्तेही मजबूत करण्यात येणार आहेत.
तसेच तांबवे–हरिजनवस्ती रस्ता, पडेंगाव–फार्म रस्ता, टाकळवाडे–फुलेवस्ती रस्ता, तरडगाव–गायकवाडवस्ती मार्ग, सुरवडी–खांबाळे मार्ग, कुरवली मार्ग अशा अनेक महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणा कामांचा या मंजुरीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय मांडवखडक–निरगुडी–जिंती रस्ता, जिंती–साखरवाडी–नांदल–उपळवे मार्ग, भुईंज–देगाव–राऊतवाडी–पिंपोडे रस्ता तसेच इतर अनेक ग्रामीण मार्गांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. गावांतर्गत काही रस्त्यांचे काँक्रीटीकरण केल्यामुळे पावसाळ्यातील चिखल व वाहतूक अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
या कामांमुळे ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक, विद्यार्थ्यांची शाळा-कॉलेजला जाणे तसेच नागरिकांची दैनंदिन ये-जा अधिक सोयीची होणार आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त करताना सांगितले की, मतदारसंघाच्या विकासासाठी मी स्वतः व आमदार सचिन पाटील दोघेही सातत्याने पाठपुरावा करीत होतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे नामदार शिवेंद्रराजे भोसले व राज्य शासनाने या कामांना मंजुरी दिल्यामुळे मतदारसंघातील विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मंजूर झालेली सर्व कामे नियोजित वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
▪️ चौकट
महत्त्वाच्या रस्ते विकास कामांना मंजुरी

  • तांबवे – हरिजनवस्ती रस्ता सुधारणा
  • पिंपळवाडी ते सात सर्कल रस्ता सुधारणा
  • नांदल – सुरवडी – पिंपळवाडी मार्ग सुधारणा
  • तरडगाव – गायकवाडवस्ती मार्ग सुधारणा
  • पडेंगाव – फार्म रस्ता सुधारणा
  • टाकळवाडे– फुलेवस्ती रस्ता सुधारणा
  • सुरवडी – खांबाळे रस्ता सुधारणा
  • कुरवली – विटपर्णे मार्ग सुधारणा
  • मांडवखडक – निरगुडी – जिंती रस्ता सुधारणा
  • जिंती – साखरवाडी – नांदल – उपळवे मार्ग सुधारणा
    ▪️ चौकट
    ग्रामीण भागाला होणारे प्रमुख फायदे
    @ गावागावांतील संपर्क मजबूत होणार
    @ शेतमाल वाहतुकीस मोठी मदत
    @ विद्यार्थ्यांची ये-जा सुलभ
    @पावसाळ्यातील रस्त्यांच्या समस्या कमी
    @ ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना
    ▪️ चौकट
    ९३ कोटींचा निधी; विकासाला नवी गती
  • ७० पेक्षा अधिक रस्ते सुधारणा कामे
  • प्रमुख जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते समाविष्ट
  • डांबरीकरण, काँक्रीटीकरण व मजबुतीकरण
  • अनेक गावांतील अंतर्गत रस्त्यांचे काम
  • फलटण–कोरेगाव मतदारसंघाच्या विकासाला चालना
Spread the love
  • Related Posts

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटण( आपलं फलटण ) फलटण तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आगामी काही दिवसांत फलटणमध्ये अतिरिक्त MIDC उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत…

    Spread the love

    सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा बिगुल१८ जूनला मतदान; २२ जूनला मतमोजणी, आचारसंहिता तात्काळ लागू

    फलटण : वृत्तसेवा: सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून मतदारसंघात तात्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. संबंधित सदस्यांचा कार्यकाळ…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    धुळदेव येथे गांजा विक्रीचा डाव उधळला; सोलापूरच्या दोघांना अटक४ किलो ६९ ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईलसह २.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    रन फॉर एज्युकेशन’चा संदेश देत ३ जूनला फलटणमध्ये मिनी मॅरेथॉन

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    ॲडव्होकेट ऍक्टमध्ये व्यापक सुधारणांची मागणीयेत्या संसदीय अधिवेशनात सुधारित कायदा सादर करण्याची ॲड. कांचन खरात यांची मागणी

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणच्या औद्योगिक विकासाला मोठी गती; अतिरिक्त MIDC ची घोषणा, ‘आगामी आमदार शिवसेनेचाच’ — उदय सामंत

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    फलटणचा बहुमान: सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान!

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

    १५ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
    error: Content is protected !!