गिरवीचा विशाल वाघ PSI परीक्षेत राज्यात प्रथम

फलटण (आपलं फलटण) : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर फलटण तालुक्यातील गिरवी गावच्या सुपुत्राने राज्यभरात यशाचा झेंडा रोवला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात विशाल नारायण वाघ याने पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी राज्यात प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले आहे. याचबरोबर राज्य कर निरीक्षक (STI) पदासाठीही त्याची राज्यात २८ व्या क्रमांकाने निवड झाली आहे.
विशाल वाघ याने PSI पदासाठी आवश्यक असलेल्या शारीरिक चाचणीची तयारी फलटण येथील योद्धा करिअर अकॅडमीमध्ये संस्थापक व मार्गदर्शक रणजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. त्यांच्या मार्गदर्शनाचा या यशात मोठा वाटा असल्याचे विशालने सांगितले.
विशालचे शिक्षण २०२१ साली कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयात पूर्ण झाले. त्यानंतर गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्याने एमपीएससी स्पर्धा परीक्षेची सातत्याने तयारी केली. अनेक अडचणींवर मात करत अखेर त्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवत आपल्या कष्टांचे चीज केले.
आपल्या यशाबद्दल बोलताना विशाल म्हणाला, “माझ्या आई-वडिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मला शिक्षण दिले. त्यांच्या कष्टामुळेच आज हे यश मिळाले आहे. हे यश मी माझ्या आई-वडिलांना समर्पित करतो.” त्याची बहीण तनश्री हिने देखील राज्यसेवा परीक्षेत निरीक्षण अधिकारी (पुरवठा) पद मिळवून कुटुंबाचा मान उंचावला आहे.
सध्या विशालने राज्य कर निरीक्षक (STI) पदासाठी मुंबई येथील माझगाव येथे प्रशिक्षण पूर्ण केले असून पुढील २० ते २५ दिवसांत त्याचे रुजू होणे अपेक्षित आहे. PSI पदासाठीचे प्रशिक्षण सहा ते सात महिन्यांनंतर होणार असल्याने तोपर्यंत STI पदावर काम करत पुढे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा करण्याची त्याची इच्छा आहे.
गिरवी गावातील या तरुणाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशामुळे संपूर्ण फलटण तालुक्यातून त्याचे अभिनंदन होत असून तरुणांसाठी तो प्रेरणादायी ठरला आहे.

Spread the love
  • Related Posts

    विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी सांस्कृतिक पर्वाची मेजवानी!लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा गोंधळ; भव्य दांडिया स्पर्धा अन् आकर्षक बक्षिसांची पर्वणी

    आपलं फलटण : (विडणी प्रतिनिधी) शारदीय नवरात्रोत्सव २०२६ निमित्त विडणी येथे माता-भगिनींसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेले लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांचा पारंपरिक देवीचा…

    Spread the love

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!