वेळोशी (ता. फलटण) येथे रानडुकराचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी

फलटण( आपलं फलटण) : फलटण तालुक्यातील वेळोशी परिसरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची घटना घडली असून, घास कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज (शुक्रवारी) सकाळी वेळोशी (ता. फलटण) येथील शेतकरी किसन रघुनाथ रोमन हे आपल्या घरासमोरील रानात घास कापण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक समोर आलेल्या वन्यप्राणी रानडुकराने त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत जखमी किसन रोमन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, परिसरात रानडुक्कर व इतर वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे
याबाबत नुकतेच फलटण-कोरेगावचे आमदार सचिन पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करून फलटण मतदार संघातील डोंगर कपारी च्या गाव परिसरात वन्यप्राण्यांमुळे शेतकरी व नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे शासनाचे लक्ष वेधले होते. तसेच वनमंत्र्यांकडे लेखी निवेदन देऊन शेतकऱ्यांचे व त्यांच्या शेती पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
चौकट : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
वेळोशी व परिसरातील शेतांमध्ये रानडुक्करांचा वावर वाढला असून पिकांचे नुकसान तसेच शेतकऱ्यांवर हल्ल्यांच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर शेतात काम करताना सतत भीतीच्या सावटाखाली असतात वनविभागाने तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
सुरेश रोमन
मा. सरपंच वेळोशी ता. फलट

Spread the love
  • Related Posts

    फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनुभवी अधिकाऱ्याची साथसहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीपदी सचिन विधाते रुजू; अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

    फलटण, दि. २४ : फलटण व माण तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) पदावर सचिन विधाते यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीचे अधिकारी,…

    Spread the love

    प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगर बीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त

    प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोशावर फलटण पंचायत समिती; रिक्त पदांचा वाढता डोंगरबीडीओ, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यासह अनेक महत्त्वाची पदे रिक्त; जूनअखेर आणखी दोन अधिकारी सेवानिवृत्त आपलं फलटण( प्रतिनिधी )फलटण पंचायत समितीचा…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रा. रमेश आढाव यांना अभिवादनपत्रकारिता, शिक्षण, साहित्य आणि समाजकारणातील दीपस्तंभास कृतज्ञ स्मरण

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    भारतीय कृषी संशोधनाचा सुवर्णक्षण शाश्वत शेतीच्या नव्या युगाची सुरुवात केबी बायो ऑरगॅनिकच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक मंडळाची मान्यता

    फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी

    फलटणच्या विकासाला ७० कोटींची सुवर्णभरारी; अंतर्गत रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचेरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून तातडीची मंजुरी

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

    मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या षडयंत्राला बळी पडू नये; सभासदांच्या बळावर श्रीराम कारखाना सुरू करणारच – आमदार रामराजे नाईक-निंबाळकर

    पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती

    पालखीसाठी फलटण तालुक्यात आरोग्य विभाग सज्ज     भाविकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी व्यापक नियोजन; सभापती शिवांजली भोसले यांची माहिती

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : फलटण शहरात विशेष वाहतूक आराखडा जाहीर१७ व १८ जुलै रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा : फलटण शहरात विशेष वाहतूक आराखडा जाहीर१७ व १८ जुलै रोजी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे शहर पोलिसांचे आवाहन
    error: Content is protected !!