आपलं फलटण :राजाळे, ता. फलटण : महिला सहकारातून आर्थिक स्वावलंबनाचं उत्तम उदाहरण ठरलेल्या सियाराम महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, राजाळे या संस्थेने अवघ्या तीन महिन्यांत दमदार कामगिरी केली आहे. संस्थेच्या एकूण ठेवी २ कोटी ९१ लाख रुपयांवर पोहोचल्या असून, कर्जवाटप २ कोटी ५ लाख रुपयांपर्यंत गेलं आहे.
संस्थेने आतापर्यंत १ कोटी २५ लाख रुपयांचं सोनेतारण कर्ज वाटप केलं आहे. संस्थेचं अधिकृत भागभांडवल 25 लाख रुपये असून, वसूल भागभांडवल ५ लाख ५३ हजार रुपये आहे. जिल्हा बँकेत ४५ लाख रुपयांची सुरक्षित गुंतवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संस्थेची थकबाकी आणि एनपीएचे प्रमाण ० टक्के आहे, ही बाब ग्रामीण सहकार क्षेत्रात कौतुकास्पद मानली जात आहे.
सभासदांसाठी संस्थेने अनेक आकर्षक योजना सुरू केल्या आहेत. मुदत ठेव १ वर्षासाठी १० टक्के व्याजदराने, मासिक व्याज मुदत ठेव योजना १० टक्के व्याजदराने, दामदुप्पट मुदत ठेव ८ वर्षांच्या कालावधीसाठी, रिकरिंग ठेव ९.५ टक्के व्याजदराने उपलब्ध आहे. लखपती रिकरिंग ठेव योजनेत दरमहा ४१६० रुपये भरल्यास १८ महिन्यांनी १ लाख रुपये परतावा मिळणार आहे. याशिवाय लोकमंगल ठेव योजना आणि बचत ठेव योजना सुरू आहेत.
सोने तारण कर्जात प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी 109000 हजार रुपये कर्ज केवळ ५ मिनिटांत उपलब्ध होत आहे. व्यवसाय कर्ज आणि पगार तारण कर्ज सुविधा कमीत कमी व्याजदरात दिली जात आहे. त्यामुळे शेतकरी, महिला आणि लहान व्यावसायिकांना तातडीच्या गरजेसाठी मोठा आधार मिळाला आहे.
महिला सभासदांच्या विश्वासावर आणि पारदर्शक कारभारावर उभ्या असलेल्या या संस्थेच्या कामगिरीबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.
संपर्क : 8237 919637 8779877758






