फलटण : आपलं फलटण :
ग्रामीण भागातील कला, संस्कृती, साहित्य, शिक्षण आणि सामाजिक जाणीवांना व्यासपीठ मिळवून देतानाच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागाची चळवळ उभी करता येते, याचा आदर्श वस्तुपाठ ठरलेला दुधेबावी फेस्टिव्हल यंदा सलग २६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. दुधेबावी (ता. फलटण) येथील दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवार, दि. ६ ते मंगळवार, दि. १० नोव्हेंबरदरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता संत गाडगेबाबा व्याख्यानमालेसह विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या हस्ते होणार असून, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील अध्यक्षस्थानी असणार आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी ही माहिती दिली.
ग्रामीण भागात सातत्याने २६ वर्षे एखादा सांस्कृतिक आणि वैचारिक उपक्रम अखंडपणे सुरू ठेवणे ही केवळ संस्थेची कामगिरी नसून ग्रामस्थांच्या एकजुटीची, सामाजिक बांधिलकीची आणि विधायक दृष्टिकोनाची साक्ष आहे. संत गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा जपत व्याख्यानमालेच्या माध्यमातून समाजप्रबोधन, तर सांस्कृतिक कार्यक्रमांतून कला आणि लोकपरंपरेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या फेस्टिव्हलमधून केला जात आहे.
उद्घाटन समारंभास विशेष अतिथी म्हणून प्रशासन व व्यवस्थापन वनविभाग कुंडल (सांगली)चे प्रशासकीय अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे आणि चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड, बारामतीचे चेअरमन किशोर कुमार शहा उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते उदयराव शिंदे, अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके, राष्ट्रीय शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष बलवंत पाटील, महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन विशाल कणसे, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अरविंदभाई मेहता, महाराष्ट्र राज्य पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता दिनकरराव सोनवलकर, पंचायत समिती सदस्या सौ. विजया सोनवलकर, ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. भावना सोनवलकर, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाषराव सोनवलकर, फलटण येथील नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, महावितरण बारामतीचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर आणि जलविद्युत प्रकल्प सातारा येथील उपविभागीय अभियंता दिग्विजय सोनवलकर उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन समारंभाचे औचित्य साधून सुप्रसिद्ध निवेदक राजेंद्र खरात प्रस्तुत आणि वाघमोडे ज्वेलर्स अँड सन्स प्रायोजित ‘खेळ रंगला पैठणीचा’ हा महिलांसाठी विशेष मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामुळे फेस्टिव्हलच्या सांस्कृतिक रंगतदार वातावरणात आणखी भर पडणार आहे.
याच समारंभात चंदूकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड, बारामतीचे चेअरमन किशोर कुमार शहा यांना राज्यस्तरीय ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांना राज्यस्तरीय ‘प्रशासनरत्न पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान सांगली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव भूषविणार आहेत. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रा. पोपटराव मिंड, चक्रधर अॅग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड, दुधेबावीचे संस्थापक संपतराव नाळे आणि मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक सागर नाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संत गाडगेबाबा व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष डॉ. सागर कराडे, सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष सचिन सोनवलकर, क्रीडा समितीचे अध्यक्ष कांता सोनवलकर, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विजयकुमार नाळे, सचिव विठ्ठल सोनवलकर, खजिनदार डॉ. युवराज एकळ आणि कार्याध्यक्ष संतोष भांड यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी उपक्रमात ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भानुदास सोनवलकर, शेखर चांगण, राजेंद्र नाळे, संतोष मोरे, ज्ञानेश्वर सोनवलकर आणि सुमित नाळे यांनी केले आहे.






