आपलं फलटण : कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचार मंचाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या २७ व्या राज्यस्तरीय अर्थशास्त्र सहकार परिषदेनिमित्त प्रकाशित होणाऱ्या ‘अर्थवेध’ या पुस्तिकेसाठी शोधनिबंध पाठविण्याचे आवाहन विचार मंचाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शरद शेटे यांनी केले आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचार मंच ही राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अर्थशास्त्र व सहकार विषय अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची संस्था आहे. मंचाचे २७ वे वार्षिक अधिवेशन श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्त २७ वी राज्यस्तरीय अर्थशास्त्र सहकार परिषद होणार आहे.
या परिषदेसाठी प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘अर्थवेध’ पुस्तिकेसाठी ‘आखाती युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम’, ‘कृषी उत्पन्न बाजार समिती व विकास सहकारी सेवा सोसायटी यांचे ग्रामीण विकासातील योगदान’ तसेच ‘श्री सेवागिरी देवस्थान तीर्थक्षेत्र, पुसेगाव यांचे परिसराच्या आर्थिक व सामाजिक विकासातील योगदान’ या विषयांवर शोधनिबंध मागविण्यात आले आहेत.
शोधनिबंध ३ हजार शब्दांपर्यंत मराठी अथवा इंग्रजी भाषेत असावा. इच्छुक लेखकांनी आपले शोधनिबंध ३१ ऑक्टोबरपर्यंत arthashastravicharmanch@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत.
अधिक माहितीसाठी प्रा. सतीश जंगम (७५८८५५९८९८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विचार मंचाच्या वतीने करण्यात आले
फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन
आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…






