.सभासदांच्या विश्वासाची जपणूक हेच आमचे यश; १० टक्के लाभांशातून विश्वासाला मान — सचिन यादव पाच शाखा ७० कोटींच्या ठेवी; ५५ कोटींचे कर्जवाटप, १२५ कोटींचा एकत्रित व्यवसाय;

आपलं फलटण:

सभासदांचा विश्वास, संचालक मंडळाचे मार्गदर्शन आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून गॅलेक्सी प्लस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, फलटणने आर्थिक वाटचाल पुढे सुरू ठेवली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात आला असून, संस्थेच्या प्रगतीचा लाभ सभासदांपर्यंत पोहोचविण्याच्या भूमिकेचा हा एक भाग असल्याचे प्रतिपादन संस्थापक अध्यक्ष सचिन यादव केले .संस्थेच्या स्थापनेपासून सभासदांशी विश्वासाचे नाते निर्माण करून ते पारदर्शक व्यवहारातून टिकविण्यास प्राधान्य देण्यात आले. आर्थिक संस्थेची खरी ताकद केवळ ठेवी-कर्जाच्या आकडेवारीत नसून सभासद आपला पैसा आणि आर्थिक गरजा विश्वासाने संस्थेकडे सोपवतात, यामध्ये असल्याचे यादव यांनी नमूद केले.संस्थेच्या सध्या पाच शाखा कार्यरत असून सुमारे ७० कोटी रुपयांच्या ठेवी संकलित झाल्या आहेत. सभासदांच्या विविध आर्थिक गरजांसाठी सुमारे ५५ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असून संस्थेचा एकत्रित व्यवसाय १२५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यंदाही संस्थेला ‘अ’ वर्ग ऑडिट प्राप्त झाले आहे.बदलत्या आर्थिक व्यवहारपद्धतीनुसार संस्थेने तंत्रज्ञानाचा स्वीकार केला असून गोल्ड टेस्टिंग मशीन, मोबाईल बँकिंग आणि डिजिटल पिग्मी यांसारख्या सुविधांचा वापर केला जात आहे. पारंपरिक सहकाराच्या विश्वासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत सभासदांसाठी व्यवहार अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.संस्थेने पुणे जिल्ह्याचे कार्यक्षेत्र स्वीकारत शाखाविस्ताराला सुरुवात केली आहे. बारामती येथे नवीन तालुका कार्यक्षेत्र असलेली गॅलेक्सी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची अद्ययावत शाखा सुरू करण्यात आली आहे. तसेच अथक प्रयत्नांनंतर केंद्र सरकारकडून गॅलेक्सी मल्टीस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीसाठी परवानगी मिळवून फलटण येथे शाखा ही सुरू केली आहे .“सभासदांचा विश्वास हीच संस्थेची खरी ताकद आहे. तो विश्वास जपणे, व्यवहारात पारदर्शकता ठेवणे आणि संस्थेच्या प्रगतीचा योग्य लाभ सभासदांपर्यंत पोहोचविणे, हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे,” असेही सचिन यादव यांनी सांगितले.दहा टक्के लाभांश हा आर्थिक परताव्यासोबतच संस्थेच्या वाटचालीत सभासदांचा सहभाग आणि त्यांच्याप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित करणारा आहे. सहकारात संस्था उभी करणे महत्त्वाचे असले, तरी सभासदांनी ठेवलेल्या विश्वासाला पात्र ठरणे त्याहून महत्त्वाचे आहे. आर्थिक शिस्त, पारदर्शक व्यवहार, सभासदकेंद्री दृष्टिकोन आणि काळानुरूप तंत्रज्ञानाचा स्वीकार या आधारावर गॅलेक्सीची पुढील वाटचाल सुरू आहे

Spread the love
  • Related Posts

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    आपलं फलटण | फलटण प्रतिनिधीफलटण : दुष्काळसदृश परिस्थितीत तालुक्यातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच त्यावर प्रभावी उपाययोजना राबवाव्यात आणि प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर

    शरयु ॲग्रोच्या १२ व्या गळीत हंगामाचा दिमाखदार प्रारंभ!​गाळप क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन १ किलो सवलतीची साखर
    error: Content is protected !!