फलटण : (आपलं फलटण प्रतिनिधी )लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने प्रौढ साक्षरता दिनानिमित्त माळजाई मंदिर येथे कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी आजी-माजी स्वातंत्र्यसैनिकांना बँकिंग क्षेत्रातील फसवणूक तसेच सायबर फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन बँकिंग व डिजिटल व्यवहारांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याचबरोबर ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आयसीआयसीआय बँकेचे ब्रँच मॅनेजर किरण फडतरे व प्रफुल्लकुमार शिर्के यांनी उपस्थितांना बँकिंग फ्रॉडपासून बचाव करण्याच्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. OTP, PIN, पासवर्ड, बँक खात्याची माहिती अथवा अन्य गोपनीय तपशील कोणत्याही अनोळखी व्यक्तीस देऊ नये. संशयास्पद फोन, संदेश व लिंकपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ फलटणचे अध्यक्ष रणजीत बर्गे, आयसीआयसीआय बँकेचे ब्रँच मॅनेजर किरण फडतरे, प्रफुल्लकुमार शिर्के, फलटण तालुका आजी-माजी स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब खरात, मार्गदर्शक सुनील शेवते, लायन्स आय हॉस्पिटलचे चेअरमन अर्जुनराव घाडगे, सचिव चंद्रकांत कदम, महेश गरवालीया आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लबचे सचिव प्रमोद निंबाळकर यांनी केले. प्रौढ साक्षरता दिनाचे महत्त्व विशद करताना ज्येष्ठ नागरिक व आजी-माजी स्वातंत्र्यसैनिकांना आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल व्यवहार आणि ऑनलाइन फसवणुकीबाबत जागरूक करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी महेश गरवालीया यांनी प्रमुख पाहुणे, मान्यवर तसेच उपस्थित आजी-माजी स्वातंत्र्यसैनिकांचे आभार मानले.
शं






