आपलं फलटण | प्रतिनिधी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विकासवादी विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून पर्यावरण संवर्धन आणि शिक्षणाला प्राधान्य द्यावे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरात किंवा शेतात किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे. वृक्षसंवर्धन हीच अजितदादांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन फलटण विधानसभेचे आमदार सचिन पाटील यांनी केले.

वाखरी (ता. फलटण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश चिटणीस तथा फलटण पंचायत समितीचे मा. सभापती श्री. रामभाऊ ढेकळे पाटील यांच्या सौजन्याने दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शालेय साहित्य वाटप, वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन संकल्प कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार सचिन पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणासोबत पर्यावरणाचे महत्त्वही अधोरेखित केले. “आज लावलेले झाड उद्याच्या पिढीला शुद्ध प्राणवायू देईल. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेले झाड जगविण्याची जबाबदारी स्वीकारावी,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महानंद दूध डेरीचे माजी व्हाईस चेअरमन डी. के. पवार (अण्णा), राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक उपाध्यक्ष मनोज देशमुख, आंतरराष्ट्रीय हॉकीपटू कु. अक्षता ढेकळे पाटील, जिल्हा युवा उपाध्यक्ष अतुल शहा, विकास राऊत, माजी चेअरमन दादा पाटील, माजी सरपंच जगन्नाथ जाधव, प्रवीण गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, दादासो गरड, पै. दिगंबर जाधव, कृष्णात कुंभार गुरुजी, स. रा. मोहिते गुरुजी, पंढरीनाथ धायगुडे, दत्तात्रय मोहिते, डॉ. गणेश धायगुडे, आबा मोहिते, आप्पासो ढेकळे, विलास गरड, राजेंद्र ढेकळे, अनिल सूर्यवंशी, जोतिराम बनकर, मुगटराव ढेकळे, बाबूराव ढेकळे, संतोष गरड, राजाभाऊ तांबे, शिवाजीराव ढेकळे, राकेश जाधव, संभाजी ढेकळे, अक्षय जाधव, राजाभाऊ सुळ, दशरथ राऊत, माणिकराव ढेकळे, सोनबा कुंभार, मेघनाथ ढेकळे, बाळासाहेब जाधव (फौजी), केतन ढेकळे, तानाजी आवटे, चंद्रकांत गायकवाड, जयसिंग गरड, सतीश ढेकळे, नितीन गायकवाड, बुवासो राऊत, अमोल जाधव, अमर काटकर, दत्तात्रय फडतरे, गणपत जाधव, वसंत गायकवाड, अशोक काकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच शाळेतील सर्व आदरणीय प्राथमिक शिक्षकवृंद, शालेय शिक्षण समिती, वाखरी गावातील समस्त ग्रामस्थ, तसेच सौरभ ढेकळे, अभिषेक ढेकळे, अजिंक्य ढेकळे, सागर जाधव, विनय गरड, प्रशांत जाधव, प्रथमेश गरड, सुमित गरड, प्रज्वल धोंगडे यांच्यासह परिसरातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विकासदृष्टीचा आदर्श समाजाने स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देतानाच पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनीही अजितदादांच्या कार्याचा गौरव करत समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स. रा. मोहिते गुरुजी यांनी केले, तर सूत्रसंचालन कृष्णात कुंभार गुरुजी यांनी केले. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम प्रेरणादायी आणि सामाजिक संदेश देणारा ठरला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश चिटणीस तथा फलटण पंचायत समितीचे मा. सभापती श्री. रामभाऊ ढेकळे पाटील यांच्या सौजन्याने हा प्रेरणादायी उपक्रम संपन्न झाला.





