अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला २० वर्षांची शिक्षा फलटण न्यायालयाचा निकाल; ग्रामीण पोलिसांच्या प्रभावी तपासाला यश

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला २० वर्षांची शिक्षा
फलटण न्यायालयाचा निकाल; ग्रामीण पोलिसांच्या प्रभावी तपासाला यश
आपलं फलटण प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपीस फलटण येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. या निकालामुळे ग्रामीण पोलिसांच्या प्रभावी तपासाला न्यायालयाने दुजोरा दिला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विडणी (ता. फलटण) येथे मे 2018 मध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी आरोपी दशरथ बबन बनकर (वय ३८, रा. विडणी, ता. फलटण) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक आर. आर. भोळ यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. जी. भोसले यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील भोसले आणि वैभव काटकर यांनी प्रभावी बाजू मांडली. खटल्यादरम्यान एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले तसेच परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले.
सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३७६ तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये २० वर्षे सक्तमजुरी व ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
या प्रकरणाच्या तपासासाठी तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक आर. आर. भोळ यांच्यासह कोर्ट पैरवी अंमलदार, तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामकाज पाहिले. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी धन्यकुमार गोडसे तसेच फलटण ग्रामीण पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली.

Spread the love
  • Related Posts

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    आपलं फलटण: मुंबई वृत्तसेवा : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑक्टोबर २०२६ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता…

    Spread the love

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    आपलं फलटण | फलटणफलटण संस्थानाचा ऐतिहासिक वारसा, नाईक-निंबाळकर घराण्याचे योगदान आणि विसाव्या शतकातील संस्थानांच्या वाटचालीचा संशोधनात्मक मागोवा घेण्यासाठी फलटणमध्ये इतिहास अभ्यासकांची मांदियाळी जमणार आहे. सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आणि…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन!मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे राज्य सरकारचे आवाहन; ऑक्टोबरच्या वेतनातून कपात करण्याबाबत परिपत्रक जारी

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    फलटण संस्थानचा इतिहास राष्ट्रीय परिषदेत उलगडणार; मुधोजी महाविद्यालयात शनिवारी इतिहास परिषदेचे १७ वे वार्षिक अधिवेशन

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    टंचाईग्रस्त गावांना पाण्यापासून वंचित राहू देणार नाही!आमदार सचिन पाटील यांची १८ पाणी साठवण योजनांची प्रत्यक्ष पाहणी; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

    श्रीदत्त यंदा उच्चांकी गाळप करणार!अजितराव जगताप यांचा विश्वास; श्रीदत्त इंडिया साखर कारखान्याच्या २०२६-२७ गळीत हंगामाचा उत्साहात प्रारंभ.

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन

    फलटण शहरात पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात!दुष्काळी परिस्थितीमुळे नगरपरिषदेचा निर्णय; १६ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी, स्विमिंग पूल व वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
    error: Content is protected !!