आपलंफलटण प्रतिनिधी: माझेरी पुनर्वसित (ता. फलटण )येथील युवा कार्यकर्ते कै. सचिन प्रकाश दिघे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ शुक्रवार, दि. 19 जून 2026 रोजी दुपारी 12 वाजता फुलांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करावी, असे विनम्र आवाहन करण्यात आले आहे. कै. दिघे यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या पश्चात कुटुंबीय, मित्रपरिवार आणि समाजातील अनेक जण शोकाकुल झाले आहेत.
शोकाकुल : समस्त दिघे परिवार व शिवगर्जना मित्र मंडळ, माझेरी ता फलटण





