बागायती पिकांसाठी चौरसाकृती लागवड पद्धतीचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आपलं फलटण( प्रतिनिधी ) फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या वतीने ‘बागायती पिकांमध्ये चौरसाकृती लागवड प्रणाली’ या विषयावरील प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमामध्ये चौरसाकृती लागवड पद्धतीचे विविध फायदे, योग्य नियोजन, लागवडीतील अंतर व्यवस्थापन तसेच पाण्याचा कार्यक्षम वापर याबाबत शेतकरी बांधवांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः डाळिंब पिकासाठी चौरसाकृती लागवडीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक लागवड तंत्रज्ञानाची उपयुक्त माहिती मिळाली.
या उपक्रमाला परिसरातील शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कृषी कन्या साक्षी नाझीरकर, विद्या नवले, अस्मिता निवसे, जोगेश्वरी लोकरे, मोनाली कोळपे, श्रावणी भागवत आणि गौरी जाधव यांनी प्रशिक्षणाचे नियोजन व प्रात्यक्षिक सादरीकरणात सक्रिय सहभाग घेतला.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे, कार्यक्रम समन्वयक नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितिशा पंडित तसेच प्रा. संजय अडत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून, या प्रात्यक्षिकामुळे बागायती पिकांच्या उत्पादनवाढीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Spread the love
  • Related Posts

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर…

    Spread the love

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण: आपलं फलटण प्रतिनिधी : फलटण प्रांत कार्यालयाशी संबंधित काम करून देण्याच्या मोबदल्यात ५० हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी कारवाई केल्याची माहिती समोर आली…

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण उपजिल्हा रुग्णालयात ‘प्रशासकीय कारभार’ ऐरणीवर!वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; डॉ. रूपनवर प्रकरणाच्या चौकशीतील निष्कर्षांचा संदर्भ

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    फलटण प्रांत कार्यालयातील कामासाठी ५० हजारांची लाच?खाजगी एजंटला रक्कम स्वीकारताना एसीबीकडून रंगेहात ताब्यात

    शिवभक्तांचा संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    शिवभक्तांचा  संकल्प… टाकळवाडेकरांच्या एकजुटीतून साकारले महादेवाचे मंदिर!

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    ग्रामस्थांच्या वर्गणीतून साकारले श्री महादेव मंदिर;दि. 30 रोजी टाकळवाडेत भव्य कलशारोहण सोहळा

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    मुधोजी महाविद्यालयातून पंतप्रधानांशी विद्यार्थ्यांचा थेट संवाद‘खेलो इंडिया युवा संवाद २०२६’चे आयोजन; क्रीडा, फिटनेस व निरोगी जीवनशैलीचा संदेश

    कथालेखनाला मिळणार योगेश सोमण, प्रमोद पवार यांचे मार्गदर्शन व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार व शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त साताऱ्यात कार्यशाळा; नवोदित लेखकांसाठी सुवर्णसंधी

    error: Content is protected !!